Download App

…तरीही शिंदे सरकार कोसळणार नाही, भुजबळांचं मोठं विधान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रिपद गेलं तरी हे सरकार कोसळणार नसल्याचं मोठं विधान राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी केलं आहे. नाशिक दौऱ्यावर असताना छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

Ram Charan photo : दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि उपासना कामिनेनी कोनिडेलाच्या बेबी शॉवरचे खास फोटो

भुजबळ म्हणाले, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत संपादक आहेत. त्यांना याबाबत माहिती असल्याने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत वक्तव्य केले आहे. जर हे 16 आमदार अपात्र झाले तर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाऊ शकते.

अतिक अहमदच्या कार्यालयात सापडले आक्षेपार्ह साहित्य, पोलीस यंत्रणा अर्लट

एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद गेलं तरी सरकार कोसळणार नाही कारण 165 आमदारांचा पाठिंबा त्यांना असणार आहे, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार आहे, सरकार कोसळणार असल्याचं राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. सत्तासंघर्षावर सुनावणी झाली तरी 16 आमदारांच्या अपात्रतेचा तिढा सुटला नाही.

मुख्यमंत्री बदलेलं पण सरकार बदलणार नाही; छगन भुजबळांचा दावा; राऊतांच्या वक्त्यव्यावर म्हणाले…

राजकीय घडामोडी घडत असतानाच शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं. महाविकास आघाडीतील पक्ष आगामी निवडणुकीत एकत्र दिसतील का याबाबत शंका पवारांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.

Sachin Tendulkar 50th Birthday : महान सचिन तेंडुलकरचे महान वर्ल्ड रेकॉर्ड्स

याआधी जळगाव दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरत या सरकारचे डेथ वॉरंट काढल्याचे बोलले होते. त्याचबरोबर येत्या पंधरा दिवसांत हे सरकार कोसळणार असल्याचे ते म्हणाले होते. या सगळ्या प्रश्नावर अनेक राजकीय आपली प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान, छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, संजय राऊत संपादक आहेत, ते दिल्लीमध्ये काम करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे माहिती असेल. शिवाय गेल्या अनेक दिवसांपासून 16 आमदारांबाबत जी केस सुरु आहे. त्याबाबत जर हे 16 आमदार अपात्र झाले तर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाऊ शकतो. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद गेले तरी सरकार पडणार नाही, कारण त्यांना 165 आमदारांचा पाठिंबा आहे. 16 आमदार अपात्र झाले तरी बहुमताचा आकडा त्यांच्याकडे असल्याने सरकार पडणार नाही, असे समीकरण छगन भुजबळ यांनी मांडले आहे.

Tags

follow us