Download App

Chandrapur News : मुलगा आमदार… आई विकते बांबूच्या टोपल्या…

Chandrapur News : महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात मुलगा आमदार झाला आहे. परंतु. त्या मुलाची आई आजही रस्त्याच्या कडेला बसून बांबूच्या टोपल्या विकताना दिसत आहे. याबद्दल या आमदार मुलासह त्यांच्या आईला देखील अभिमान असल्याचे पाहायला मिळत आहे. या आमदाराची ८० वर्षांची आई सध्या चंद्रपूर शहरात माता महाकालीची यात्रेत रस्त्याच्या कडेला बांबूच्या टोपल्या विकताना दिसत आहे.

खरं तर मुलगा आमदार झाल्यावर घरी सुखात बसून जीवन जगायचे सोडून ८० व्या वर्षी देखील त्या आपला व्यवसाय नेटाने चालवत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्या देवी महाकाली यात्रेत बांबूच्या टोपला विकण्याचा व्यवसाय करत आहेत.

बांबू ताटवे, टोपल्या याचा पिढीजात धंदा करणारे जोरगेवार कुटुंब आजही आपल्या व्यवसायावर ठाम आहेत. पिढीजात पारंपारीक बांबूच्या टोपल्या बनवून विक्री करणारे किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर शहरात २०१९ ला अपक्ष निवडणूक लढवली. त्यात ते विजयी देखील झाले आहेत. मात्र, त्यानंतर त्यांनी बांबूच्या टोपल्या बनवण्याचा व्यवसाय सुरु ठेवला आहे. सध्या त्यांची ८० वर्षांची आई गंगूबाई जोरगेवार या बांबूच्या टोपल्या बनवून रस्त्याच्या कडेला बसून विक्री करताना दिसत आहे.

पुण्यातील तीन राजकीय नेत्यांना धमकी देणारा एकच… पोलिसांनी आवळल्या मुसक्या! – Letsupp

चंद्रपूर शहरात आपल्या कामावर निष्ठा असणाऱ्या एक सर्वसामान्य वाटणाऱ्या आजीबाई आहेत. सध्या माता महाकालीची यात्रा सुरु असून रस्त्याच्या कडेला बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या आजीबाई सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत. पण त्यांची दुसरी ओळख देखील असून ती सर्वानाच अश्चर्यचकीत करणारी आहे. ती म्हणजे चंद्रपूर मतदारसंघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या त्या मातोश्री आहेत. त्यांचे नाव गंगुबाई उर्फ अम्मा जोरगेवार आहे. त्यांना परिसरात सर्वजण अम्मा या नावाने हाक मारतात.

चंद्रपूरच्या मुख्य बाजारपेठेत म्हणजे गांधी चौकात वर्षभर रस्त्याच्या कडेला बसून बांबूच्या वस्तूंची त्या विक्री करतात. महाकालीच्या यात्रेत चांगली विक्री होत असल्याने दरवर्षी त्या न चुकता टोपल्या विक्रीसाठी हमखास येतात. विशेष बाब म्हणजे आमदार असलेल्या त्यांच्या मुलाला आपल्या आईच्या या व्यवसायाचे कौतुक आहे.

Tags

follow us