Chandrashekhar bawankule on manoj jarange: मराठवाड्यातील काही कुणबी जातप्रमाणपत्रे रद्द झाल्याच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण (Maratha reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणासाठी त्यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना जबाबदार धरत गंभीर आरोप केले. मराठा समाजाच्या नोंदी बोगस असल्याचा दावा करून कुणबी जातप्रमाणपत्रे (Kunbi) रद्द करण्यासाठी बावनकुळेंनी दबाव आणला, असा आरोप जरांगे यांनी केला. तसेच 15 लाख रुपयांसाठी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला. आपल्या आरोपांमध्ये तथ्य नसेल तर बावनकुळेंची नार्कोटेस्ट (narco test) करण्यात यावी, अशी मागणीही जरांगे यांनी केली.
चंद्रशेखर बावनकुळेंनीच कुणबी जात प्रमाणपत्र रद्द केले; मनोज जरांगेंचा थेट आरोप
जरांगे यांच्या आरोपांना उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण नार्कोटेस्टसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले. “माझी नार्कोटेस्ट करण्यास माझी कोणतीही हरकत नाही,” असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे किती दिवस डबल ढोलकी वाजवणार? 25-30 आमदार पाडणार; मनोज जरांगे भडकले
यावेळी त्यांनी जात पडताळणी प्रक्रियेत कोणत्याही मंत्र्याचा हस्तक्षेप नसल्याचेही स्पष्ट केले. “जात पडताळणी विभाग हा स्वतंत्रपणे काम करणारा विभाग आहे. त्याच्या निर्णयप्रक्रियेत कोणताही मंत्री किंवा राजकीय व्यक्ती हस्तक्षेप करू शकत नाही. समितीने घेतलेल्या निर्णयाविरोधात संबंधितांना उच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे,” असे बावनकुळे यांनी सांगितले.
धनुष्यबाण कोणाचा? सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढील आठवड्यात; संघटनात्मक बहुमताचा ठाकरे गटाचा दावा
मराठवाड्यातील काही कुणबी जातप्रमाणपत्रे रद्द झाल्यानंतर हा वाद अधिक तीव्र झाला असून, या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलन आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
