Chandrashekhar Bawankule On Eknath Shinde : शिवसेनेच्या जाहिरातीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कालची जाहिरात म्हणजे खोडसाळपणा आहे. आम्हाला हा विषय संपवायचा आहे. पण निश्चितच या जाहिरातीमुळे अनेकांची मने दुखावली गेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लाखो हजारो कार्यकर्त्यांना घडवले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या मनाला ठेच पोहोचली आहे, असे बावनकुळेंनी सांगितले.
बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही एवढ्या छोट्या मनाचे नाहीत. पण ज्यानी कोणी कालच्या जाहिरातमीध्ये देवेंद्रजी अन् एकनाथजींशी तुलना केली असेल ती अचंबित करणारी होती. त्यामुळे काही कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया स्वाभाविक होत्या. अशा पद्धतीच्या जाहिरातीकरुन ज्याने कुणी मनमुटाव करण्याच्या प्रयत्न केला असेल किंवा अनावधानाने झाले असेल असे पुन्हा करु नये. यात मला जास्त पडायचे नाही. पण दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी मी एकनाथजी व देवेंद्रजी यांच्याशी बोललो असल्याचेही बावनकुळे म्हणाले.
भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस हे सर्वोत्कृष्ट नेते आहेत. एकनाथजी आणि देवंद्रजी हे महाराष्ट्रात लहान-मोठ्या भावासारखे काम करत आहे. त्यामुळे कोणी या सरकारला डॅमेज करण्याचा प्रयत्न करत असेल तर असे होऊ नये याबाबत मी एकनाथजी आणि देवेंद्रजी यांच्याशी बोलणार आहे.
‘जुनी जाहिरात आमची नाही पण, नवी जाहिरात आम्हीच दिली’; देसाईंनी सांगतिलं खरं कारण
तसेच आजची जाहिरात ही शिवसेनेने दिली असल्याने त्यांच्या मंत्र्यांचे फोटो होते. तसेच काल जो खोडसाळपणा झाला तो आज त्यांनी चांगल्या भावनेने दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आणि हेच महाराष्ट्राला अपेक्षित आहे, असे बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, यावर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी आज लेट्सअप मराठी प्रतिनिधीने संवाद साधला. यावेळी त्यांनी जाहिरात वादावर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ही चूक आमच्याकडून झालेली नव्हती. कालही मी बोललो. काल वर्तमानपत्रात जी जाहिरात आली होती ती आमच्या पक्षाकडून दिली गेली नव्हती. त्रयस्थ व्यक्तीने आम्हाला ज्याची माहिती नाही अशा व्यक्तीने दिली होती. आम्ही सुद्धा त्याची माहिती घेत आहोत की जाहिरात कुणी दिली