Download App

Chatrapati Sambhajinagar खासदार जलील बैठकीला आले अन जय श्रीरामचा नारा… दंगलप्रकरणी ५०० अज्ञातांवर गुन्हे दाखल!

Chatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतता कमीटीच्या बैठकीला खासदार इम्तियाज जलील हे आले. मात्र, त्याचवेळी कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या घोषणा देण्यात दिल्या. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ४०० ते ५०० अज्ञातांवर दंगल घडवल्याचे गुन्हे दाखल केले आहेत.

संभाजीनगर येथील किराडपुरा येथे बुधवारी रात्री उशिरा दोन गटांत जोरदार वाद झाला. यात अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली. दगडफेक देखील करण्यात आली असून पोलिसांचे वाहनही जाळण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४०० ते ५०० अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर आतापर्यंत एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी वातावरण मात्र तणावाचे आहे.

खैरेंना वेड्यांच्या दवाखान्यात पाठवा; फडणवीसांवरील आरोपांना कराडांचे उत्तर – Letsupp

छत्रपती संभाजीनगरच्या जिनसी पोलीस स्टेशनमध्ये ४००-५०० अज्ञातांवर दंगल घडवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात हल्लेखोरांनी जवळपास १५ पेक्षा अधिक वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. या अज्ञातांवर पोलिसांवर हल्ला करणे, दंगा भडकवणे, शासकीय मालमत्तांचे नुकसान करणे आदी विविध कलमाअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

किराडपुरा परिसरात बुधवारी रात्री उशिरा हाणामारीची घटना घडली आहे. ४००-५०० लोकांच्या जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत सौम्य लाठीमार देखील केला. किराडपुरा परिसरात सध्या कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, तणावाचे वातावरण आहे.

(245) Ajit Pawar LIVE | ABP Majha Live | Marathi News today | Maharashtra – YouTube

Tags

follow us