Chatrapati Shivaji Maharaj Statue : मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा (Chatrapati Shivaji Maharaj Statue ) कोसळल्या प्रकरणी फरार असलेल्या शिल्पकार जयदीप आपटेला (Jayadeep Apte) पोलिसांनी अटक केलीयं. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मागील दोन आठवड्यांपासून जयदीप फरार होता. अखेर जयदीपला त्याच्या कल्याणमधील घरातून पोलिसांनी अटक केलीयं. जयदीपच्या शोधासाठी पोलिसांचं 7 पथकांकडून शोध मोहिम सुरु होती, अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला पुतळा कोसळला. या घटनेनंतर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारवर प्रचंड टीका केली . यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत. चबुतऱ्याचं स्ट्रक्चरल डिझाइन करणाऱ्या चेतन पाटील याला ताब्यात घेतले होते .
पुतळ्याप्रकरणी चेतन पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाटीलच्या कोल्हापुरातील घरी जाऊन पोलिसांनी चौकशीही केली होती. त्यानंतर पोलिसांनी चेतन पाटीलला ताब्यात घेतलं.