Download App

मोठी बातमी! छगन भुजबळांची प्रकृती खालावली, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • Written By: Last Updated:

Chhagan Bhujbal Admitted To Hospital: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भुजबळ यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये (Bombay Hospital) दाखल करण्यात आले आहे. भुजबळ यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात भरती केलं.

सोनम कपूर MAMI मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘वर्ड टू स्क्रीन’च्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून कायम 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज नियोजित पुणे दौरा होता. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा फुलेंच्या भिडे वाडा स्मारकाला भेट देणार होते. त्यामुळं मंत्री भुजबळ हे देखील पुण्यात उपस्थित होते. मात्र, सायंकाळी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तत्काळ भुजबळांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला आणण्यात आले. त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या भुजबळांवर बॉम्बे हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.

गुरुवारी सकाळपासून भुजाबळांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. दुपारी भुजबळांना ताप आणि घशाच्या संसर्गामुमळं अधिक त्रास जाणवू लागला. त्यामुळं त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. सध्या भुजबळ यांची प्रकृती स्थिर आहे.

छगन भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे भुजबळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

मोठी बातमी! छगन भुजबळांची प्रकृती खालावली, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल 

दरम्यान, छगन भुजबळ यांनी दोनच दिवसांपूर्वी मुस्लिम बांधवांसोबत ई-ए-मिलाद साजरी केली होती. मुस्लिम बांधवांच्या आनंदाचा सण ईद-ए-मिलादच्या निमित्ताने सहारा सोशल फाउंडेशनच्या वतीने येवला शहरात आरोग्य शिबिराचे आयोजन केलं होतं. . या शिबिराचे उद्घाटन छगन भुजबळ यांच्या हस्ते झालं होतं.

2022 मध्येही बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भरती…
भुजबळ यांना यापूर्वीही 2022 च्या सुरुवातीला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळीही त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी छगन भुजबळ यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

follow us