Chhagan Bhujbal On Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा करत मुंबईतील आझाद मैदानात अमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. या उपोषणासाठी मनोज जरांगे 15 सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेने रवाना देखील होणार आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी परवानगी नाकारली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून रविवारी (13 सप्टेंबर) आणि आज सोमवार (14 सप्टेंबर) रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मागण्यात आली होती मात्र मुंबई पोलिसांनी ही परवानगी नाकराल्याने जरांगे पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तर दुसरीकडे जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना परवानगी नाकारल्यानंतर राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची देखील पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मुंबईत आधीत गर्दी आहे. बदोबस्तासाठी पोलीस अपुरे पडत आहेत. त्यामुळे आंदोलनाला परवानगी नाकारली असेल. मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाला परवानगी नाकारली असावी अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून देण्यात आली आहे.
आझाद मैदान (Azad Maidan) सोडून इतर ठिकाणी आंदोलनाला गणेशोत्सवानंतर (Ganeshotsav) परवानगी देण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा करत आपण मुंबईला एकटेच जाणार असल्याची माहिती दिली आहे. समर्थकांनी आपल्यासोबत मुंबईला येऊ नये, असं आवाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आले आहे.
मोठी बातमी, मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा नाकारली परवानगी
देवेंद्र फडणवीस यांनी सणासुदीच्या काळात आपल्या विरोधात डाव टाकल्याचा आरोप जरांगे यांनी केला. त्याला जशास तसं उत्तर देण्यासाठी आपल्यालाही डाव टाकावा लागणार असल्याचं ते म्हणाले. आता आपण एकटेच मुंबईत येणार असल्याने सरकार आपल्याला आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी देणार का, असा थेट सवालही जरांगे यांनी फडणवीस सरकारला केला होता मात्र आता देखील मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना परवानगी नाकारल्याने जरांगे काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
