Chhagan Bhujbal : मंत्रिपद न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज उघडपणे नाराजी जाहीर केली आहे. मी सामन्य कार्यकर्ता आहे, मला डावललं काय आणि फेकलं काय, काय फरक पडतो. मंत्रिपदं आली गेली… (Chhagan Bhujbal) भुजबळ कधी संपला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. तसंच, त्यांना मिळालेल्या राज्यसभेच्या ऑफरवरही त्यांनी भाष्च नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज विधानसभा सभागृहाचं पहिल्या दिवसांचं कामकाज स्थगित करण्यात आलं. त्यानंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर येत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर आता छगन भुजबळ हिवाळी अधिवेशन सोडून तातडीने नाशिकला रवाना झाले आहे.
Video : हो, मी नाराज; मला डावललं काय अन् फेकलं काय? भुजबळांच्या मनातलं अखेर बाहेर आलचं
छगन भुजबळ यांना मंत्रिपद डावलल्याने ते प्रचंड नाराज आहेत. आज मीडियाशी बोलताना त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही. तुम्ही अधिवेशनात थांबणार नाही का? तुमची आता पुढची काय भूमिका आहे? असे सवाल छगन भुजबळ यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी आपल्या स्टाईलने एकाच वाक्यात उत्तर दिलं. आता बघू, जहां नहीं चैना वहां नहीं… असं म्हणत छगन भुजबळ यांनी मोठं सूचक विधान केलं आहे. छगन भुजबळ यांच्या या विधानाचे अनेक अर्थ लावले जात आहेत. भुजबळ हे अजितदादांची साथ सोडणार असल्याचे संकेत यातून मिळत आहेत. तसेच भुजबळ पुन्हा शरद पवार यांच्या गटात जाणार असल्याच्याही चर्चा आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे भुजबळ आगामी दिवसात काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्षल लागलं आहे.
प्रतारणा करणार नाही
मंत्रिपदाबाबत माझ्या नावाची चर्चा होती. पण ऐनवेळी माझं नाव का काढलं मला माहीत नाही. 7-8 दिवसांपूर्वी मला राज्यसभेवर पाठवण्याचं प्रपोजल पक्षाकडून दिलं होतं. पण मी हा प्रस्ताव नाकारला. कारण मला राज्यसभेवर जायचं नाही. मागच्यावेळी मी म्हणालो होतो. तेव्हा ते ठिक होतं. पण मी आताच निवडून आल्याने लगेच राज्यसभेवर जाणं मला मान्य नाही. कारण मी आता राजीनामा दिला तर माझ्या मतदारांशी तो विश्वासघात ठरेल. माझे मतदार रागावणार नाहीत. पण त्यांच्याशी मी प्रतारणा करू शकत नाही, असं छगन भुजबळ यांनी ठणकावलं.
छगन भुजबळ तातडीने नाशिकला रवाना होणार
छगन भुजबळ तातडीने नाशिकला रवाना होणार आहे. थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाशिकसाठी रवाना होतील. छगन भुजबळांनी आज सभागृहात हजेरी लावली. मात्र उद्यापासून छगन भुजबळ मतदारसंघात असणार अशी माहिती मिळत आहे. यावेळी नाशिकमध्ये समता परिषदेच्या काही लोकांना जाऊन छगन भुजबळ भेटणार आहेत. या भेटीमध्ये ते समता परिषदेच्या सदस्यांसोबत चर्चा करणार आहे.