पुणे : मी काही इतिहास तज्ज्ञ नसून इतिहासकारांनी जे काही लिहिलंय ते मी सांगितलं, मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या विधीमंडळातील विधानावर अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे पत्रकार परिषदेतही अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षकच असं संबोधलं आहे.
कालच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केलीय. ते म्हणाले, ज्यांना जसं वाटतंय तसं म्हणून, शकतं ज्यांना संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणायचं आहे, ते म्हणू शकतात, आणि ज्यांना धर्मवीर म्हणायचं ते म्हणू शकतात, संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणं वावगं ठरणार नसल्याची भूमिका शरद पवार यांनी मांडली होती. त्यानंतर अजित पवार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असून संभाजी महाराज हे स्वराज्यकचं असल्याचं त्यांनी म्हंटलंय.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये मी छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू इथल्या समाधीस्थळी स्मारकाबाबत अर्थसंकल्पाच्या पहिल्याच पानावर स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी स्मारक उभारण्यासाठी अर्थिक तरतूदीबद्दल उल्लेख केला. त्यानंतर शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत स्मारकाबाबत बैठक घेतली. या बैठकीत स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 269 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
त्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं. शिंदे-फडणवीस सरकारनेदेखील स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या निधीला मंजूरी दिली. या दरम्यान, संभाजी महाराजांचा उल्लेख आम्ही स्वराज्यरक्षक असाच केल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.. मी कोणत्याही महापुरुषावर वादग्रस्त विधान केलेलं नसून संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी मीच पाठपुरावा केल्यांच त्यांनी म्हंटलंय.
तसेच 14 मे 1857 ला स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बालशौर्या दिन साजरा करावा त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज बालशौर्य पुरस्कार देण्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी मीच पाठपुरावा केला असून त्या सर्व कागदपत्रांमध्ये संभाजी महाराजांचा स्वराज्यरक्षक असाचं उल्लेख असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, मी कधीही महापुरुषांबद्दल चुकीचं बोललेलो नाही, मी काही इतिहास तज्ज्ञ नाही इतिहासकारांनी जे काही लिहिलंय ते मी सांगितलं असून मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. हा विषय इतिहास संशोधकांचं आहे, इंद्रजित सावंतांनी खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवायचं काम केलं, असल्याचंही त्यांनी यावेळी म्हंटलंय.