Download App

रात्री उशीरापर्यंत सीएम फडणवीस अन् डीसीएम शिंदेंमध्ये खलबतं; शिवसेनेला गृहखातं मिळणार का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघंच काल रात्री वर्षा बंगल्यावर भेटले. या दोघांमधील बैठक रात्री

  • Written By: Last Updated:

CM Fadnavis and DCM Shinde Discussion : महायुती सरकारचा शपथविधी होण्यापूर्वी एकनाथ शिंदे हे गृहखात्यावर अडून बसल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासही फारसे उत्सुक नव्हते, अशी चर्चा होती. हा शपथविधी पार पडल्यानंतरही महायुती सरकारच्या खातेवाटपाबाबत निश्चित (CM Fadnavis) अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोणती खाती मिळणार, याबाबत अद्याप संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडली.

CM फडणवीसांनी शब्द पाळला! कोपर्डी प्रकरणातील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला लावली हजेरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघंच काल रात्री वर्षा बंगल्यावर भेटले. या दोघांमधील बैठक रात्री उशीरापर्यंत सुरु होती. या बैठकीत गृहमंत्रीपद आणि इतर खात्यांबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. परंतु, अद्यापपर्यंत या बैठकीचा तपशील समोर आलेला नाही. वर्षा बंगल्यावरील या बैठकीत तासभर सुरु असलेल्या खलबतांमध्ये मंत्रिमंडळ आणि खातेवाटपावर चर्चा झाल्याचं समजतं. आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज महायुती सरकारकडून सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. यानंतर राज्य सरकार खऱ्या अर्थाने अस्तित्ताव येईल.

त्याचबरोब 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडेल, असं प्रमुख नेत्यांकडून सांगितलं जात आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार एकाच टप्प्यात पार पडणार की सुरुवातीला मोजक्याच मंत्र्यांना शपथ देऊन महायुती सरकार हिवाळी अधिवेशनाला सामोरे जाणार, हे पाहावं लागेल. हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मंत्र्यांची खाती निश्चित होणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे आगामी 10 दिवस हे महाराष्ट्रातील राजकारणासाठी महत्त्वाचे मानले जात आहे. याच काळात राज्याचे गृहमंत्रीपद शिवसेनेला मिळणार की नाही, याचा फैसला होणार आहे.

follow us