मुंबई : मतदार कुठून आले, कुणाचे नाव यादीत आले, कोणाचे कमी झाले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाने दिली आहेत. राहुल गांधी आता कव्हर फायरचा प्रयत्न करत आहेत. खोटं बोलून स्वत:चं समाधान करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे, दिल्लीच्या निकालापूर्वी नॅरेटिव्ह सेट करत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. (Chief Minister Devendra Fadnavis responded to Leader of Opposition in the Lok Sabha Rahul Gandhi.)
दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये होणार्या प्रचंड पराभवाला झाकण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न…
(माध्यमांशी संवाद | नागपूर | 7-2-2025)#Maharashtra #Nagpur pic.twitter.com/Bffjfe7cTY
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 7, 2025
फडणवीस म्हणाले, दिल्लीतील विभानसभा निवडणुकीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. त्यात त्यांचा पक्ष पराभूत होईल, हे त्यांना माहिती आहे. म्हणून आधीच नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मतदार कुठून आले, कुणाचे नाव यादीत आले, कोणाचे कमी झाले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाने दिली आहेत. राहुल गांधी आता कव्हर फायरचा प्रयत्न करत आहेत. खोटं बोलून स्वत:चं समाधान करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे.
दरम्यान, नागपूरला रवाना होण्यापूर्वी फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील आरोपांना उत्तर दिले होते. “जब एक ही चुटकुला बार-बार सुनाया जाए तो उसपर हंसा नहीं करते! ” अशा उपहासात्मक भाषेत फडणवीस यांनी राहुल गांधींच्या आरोपांची खिल्ली उडवली होती.
जब एक ही चुटकुला बार-बार सुनाया जाए तो उसपर हंसा नहीं करते!#RahulGandhi @RahulGandhi
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 7, 2025
हुल गांधी यांनी आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत (Maharashtra Elections) खळबळजनक दावा केला. या निवडणुकीत गडबड झाली. मतदार याद्यांत गडबड झाली. पाच महिन्यांत सात लाख मतदार जोडले गेले. निवडणुकीपूर्वी इतके मतदार कसे सामील झाले? त्याचबरोबर निवडणूक आयुक्तांच्या निवडीच्या प्रक्रियेतही बदल करण्यात आला आहे. ‘2019 च्या विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ५ वर्षांत ३२ लाख मतदार जोडले गेले. परंतु, लोकसभा 2024 आणि विधानसभा निवडणुकांमधील पाच महिन्यांच्या कालावधीत 39 लाख मतदार जोडले गेले. निवडणुकीच्या आधी राज्यात इतके लोक कुठून आले? असा सवाल गांधी यांनी विचारला.