Download App

Video : रिल्स टाकणाऱ्या अधिकारी अन् कर्मचाऱ्यांवर सरकारच लक्ष; कारवाईबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?

नियम तयार झाले तेव्हा सोशल मीडिया नव्हते. आपल्या ड्युटीला ग्लोरिफाय करण्याचा प्रयत्न अधिकारी देखील करतात. सिटिजन

  • Written By: Last Updated:

CM Devendra Fadnavis : विधानसभेत आज वेगळ्याच मुद्यावरून चर्चा झाली. ती म्हणजे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग रिल्स बनवतात आणि पोस्ट करतात त्यावरून. यातून राज्य तेच चालवतात असा भास निर्माण करतात. (Fadnavis) यासंदर्भात कडक नियम आणि कारवाई करणे आवश्यक आहे अशी लक्षवेधी भाजप आमदार परिणय फुके यांनी मांडली होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. यासंदर्भात सविस्तर जीआर केला जाईल, बेशिस्त नियम खपवून घेतले जाणार नाहीत, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

नियम तयार झाले तेव्हा सोशल मीडिया नव्हते. आपल्या ड्युटीला ग्लोरिफाय करण्याचा प्रयत्न अधिकारी देखील करतात. सिटिजन एन्गेजमेन्ट करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर व्हावा. यासंदर्भात कडक नियम तयार करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सेवा शर्थीचे नियम आहेत 1989 चे त्यात वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग आणि वर्तवणूकीसंदर्भात नवे नियम तयार करण्यात येतील असे मुख्यमंत्री म्हणाले. यासंदर्भात सविस्तर जीआर काढला जाणार आहे. बेशिस्त खपवून घेतले जाणार नाही असं मी आश्वासित करतो असे मुख्यमंत्री म्हणाले.

Video: स्पर्धा परिक्षांबाबत फडणवीस यांची मोठी घोषणा; यावर्षीपासून MPSC डिस्क्रीप्टिव्ह होणार

 

follow us