Download App

महाराजांच्या महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही, चित्रा वाघ यांचा इशारा

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असा नंगा नाच चालू देणार नसल्याचं भाजप महिला मोर्चाच्या चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलंय. त्या मुंबईतून पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

दरम्यान, काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वाकयुध्द आता चांगलंच पेटलं आहे. चित्रा यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन उर्फीविरोधातली त्यांची कारवाई शेवटपर्यंत सुरुच राहणार असं सांगितलं.

वाघ म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एक महिला अंगावर नगण्य कपडे घालून भर दिवसा किळसवाणं प्रदर्शन करते याला माझा विरोध आहे. माझा विरोध उर्फीला किंवा कोणत्याही महिलेला नसून त्या वृत्तीला आहे.

त्यामुळे ज्यावेळी मी उर्फीचे व्हिडिओ पाहिले तेव्हाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असा नंगा नाच चालू देणार नाही हे ठरवलं. आम्ही घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात अनेक उड्या पडल्या.

लक्षात घ्या इथे विषय धर्माचा नसून छत्रपतींच्या त्या राज्याचा आहे जिथे महिलांचा मान सन्मान करावा लागतो. आमचा विरोध नंगा नाच करणाऱ्या विकृतीला आहे. त्यामुळे हा आमचा विरोध शेवटपर्यंत सुरू असेल आणि त्याला आम्ही पूर्णत्वाला नेणार असल्याचंही त्यांनी सांगितंल आहे.

दरम्यान, या प्रकरणात समाजाचं स्वास्थ्य महत्त्वाचं आहे की राजकारण? जिथे समाज महत्त्वाचा असतो तिथे राजकारण करण्याची काहीच गरज नाही. पण आपल्याकडे तसं होताना दिसत नाही.

चार भिंतींच्या आत तुम्ही कसे नाचतात हे कोणी पाहायला येत नाही. पण जेव्हा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी असता तेव्हा काही गोष्टी या कटाक्षाने पाळल्या पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

Tags

follow us