अजितदादा मृत्यू प्रकरणात नागरी उड्डाण मंत्र्यांचा राजीनामा घ्या; रोहित पवारांची मोठी मागणी

Rohit Pawar On Rammohan Naidu : आमदार रोहित पवार यांनी आज दिवंगत नेते अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणात तिसरी पत्रकार परिषद घेत

Rohit Pawar On Rammohan Naidu

Rohit Pawar On Rammohan Naidu

Rohit Pawar On Rammohan Naidu : आमदार रोहित पवार यांनी आज दिवंगत नेते अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणात तिसरी पत्रकार परिषद घेत मोठी मागणी केली आहे. दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी नागरी हवाई मंत्री राममोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच या पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रकरणात व्हिएसआर कंपनीला आणि त्याच्या मालकाला वाचवण्यचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा दावा देखील केला.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, नागरी उड्डाण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आम्ही पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याकडे ही मागणी करत आहोत. राहुल गांधी यांनी देखील हा विषय हाती घ्यावा ही विनंती आहे. टीडीपीचे मंत्री आहेत. त्यांचा राजीनामा घ्यावा ही आमची मागणी आहे असं या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले.

तर व्हीएसआर (VSR) कंपनीच्या मालकाचे आणि देशातील बड्या राजकारण्याचे हितसंबंध असल्याने या प्रकरणात योग्य तपास होणार का? असा प्रश्न त्यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला. व्हिएसआर कंपनीचे मालक आणि टीडीपीचे चांगले संबंध आहेत. सध्याचे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हे त्याच पक्षाचे असल्याने तपास निष्पक्ष होणार का? अपघाताला आता इतके दिवस उलटून गेले आहेत, त्यामुळे या काळात खोटी कागदपत्रे तयार केली जात तर नाही ना? अशी शंका देखील त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली.

“ट्रायंगल” मराठीतील पहिला स्पाय थ्रिलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे एका विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं होतं. अजित पवार मुंबईहून बारामती येथे एका प्रचार सभेला जात असताना विमान अपघातात त्यांचं निधन झालं होतं. यानंतर या प्रकरणात रोहित पवार यांच्यासह अनेक नेत्यांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहे.

तरुणीवर अत्याचार अन् व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंग; माजी महापौर अभिषेक कळमकरांवर गुन्हा दाखल

Exit mobile version