Devendra Fadnavis On CJP : सीजेपी म्हणजे काँग्रेस जीताओ प्रोग्रॅम असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँक्रोज जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुण्यात भाजप राज्य कार्यकारिणी कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह सीजेपीवर टीका केली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भाजपच्या (BJP) विरुद्ध फेक नॅरेटिव्ह तयार करण्यात येत आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) पेपर फुटीवर बोलत आहे पण त्यांच्या राज्यातला भ्रष्टाचार, पेपरफुटीवर काँग्रेसकडे उत्तरं नाहीत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत अर्बन नक्षल जाहीर झालेल्या संस्था होत्या. झूठ की गूंज आणि नौटंकी बंद करो राहुल गांधी अशी टीका या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसवर केली. तसेच आम्ही फेक नॅरेटिव्ह ब्रेक करुन थेट नरेटिव्ह जनतेत नेऊ असा इशारा देखील त्यांनी विरोधकांना यावेळी दिला. आता ही लढाई फेक नॅरेटिव्हच्या विरोधातली आहे असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
तर आता विरोधकांनी ही लढाई विचारसरणीवरुन इश्यूवर आणली आहे. त्यांच्याकडून शाळांवर टीका करण्यात येत आहे पण राज्यातील काही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अॅडमिशनसाठी रांगा लागल्या आहेत पण विरोधकांना या शाळा दिसत नाही. राज्यात 70 ते 75 टक्के चांगल्या जिल्हा परिषद शाळा त्यांना दिसत नाहीत. दुरुस्तीसाठी बंद वर्गाचे फोटो काढून फेक नॅरेटिव्ह विरोधक पसरवतायत असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.
सीजेपी म्हणजे काँग्रेस जीताओ प्रोग्रॅम
तर काँक्रोज जनता पार्टीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सीजेपी हे एखादी छोटी संघटना नाही. तर सीजेपी म्हणजे काँग्रेस जीताओ प्रोग्रॅम आहे. या प्रोग्रॅममध्ये तुम्हाला जे चार पाच पोर समोर दिसत आहे हे तर मोहरे आहे. त्यांच्या बैठकांना भारत जोडोमधले त्याच 180 संघटना आहे. ज्यांनी लोकसभेत आपल्या विरुद्ध नॅरेटिव्ह केला आणि विधानसभेत आपल्या विरुद्ध हारले. आता हेच नवीन नाव घेऊन मैदानात उतरत असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राजीव गांधी अक्षय ऊर्जा दिनानिमित्त आकुर्डी डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात जनजागृती अभियान
