CNG Price Hike : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पुन्हा एकदा महागाईचा फटका सर्वसामान्य लोकांना बसला आहे. एलपीजी गॅस, अमूल आणि मदर डेअरीच्या दुधाच्या दरात वाढ झाल्यानंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह लगतच्या भागात सीएनजीच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. माहितीनुसार, या भागात सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नवीन दर आजपासून लागू होणार आहे. नवीन दर आजपासून लागू झाल्याने आता मुंबई सीएनजी प्रति एक किलोसाठी 84 रुपये मोजावे लागणार आहे. सरकारी मालकीची कंपनी ‘महानगर गॅस लिमिटेड’ला (MGL) ने याबाबत माहिती दिली आहे.
एमजीएलने (MGL) दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असणाऱ्या संघर्षामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. या संघर्षामुळे ‘ब्रेंट क्रूड’ तेलाचे दर $105 वर पोहचल्याने दरवाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 12 एप्रिल 2026 रोजी सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती.
ऑटो-रिक्षाच्या भाड्यात वाढ होणार
सीएनजी दरवाढीनंतर आता मुंबईत ऑटो-रिक्षाच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मुंबई महानगर प्रदेशातील ऑटो युनियन्सनी (संघटनांनी) भाडे सुधारणेची औपचारिक मागणी केली आहे. मुंबई महानगर प्रदेशातील मोठ्या संख्येने असलेल्या ऑटो-रिक्षा, टॅक्सी, खाजगी वाहने आणि काही सार्वजनिक वाहतूक सेवा इंधन म्हणून सीएनजीवर अवलंबून आहे.
डॉ. केतन देशपांडेंना ‘डॉ. बी.एम.एल. मुंजाल सोशल इम्पॅक्ट पुरस्कार’ प्रदान-
ऑटो युनियन्सचे म्हणणे आहे की, इंधनाच्या किमतींमध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीचा चालकांच्या कमाईवर प्रतिकूल परिणाम होत आहे. ज्यामुळे सध्याच्या भाडेदरांवर वाहने चालवणे अधिकाधिक कठीण होत आहे. मुंबई महानगर प्रदेशात सुमारे 12.8 लाख वाहने सीएनजीवर धावतात. या आकडेवारीत सुमारे 4,70,000 ऑटो-रिक्षा, 1,60,000 हून अधिक टॅक्सी आणि 5,00,000 हून अधिक खाजगी वाहनांचा समावेश आहे.
