Download App

2 हजारांची नोट काळापैसा साठवण्यासाठीच छापली होती! नोटबंदीवर पृथ्वीराज चव्हाणांचा मोदी सरकारवर निशाणा

2 हजार रुपयांची नोट काळा पैसा साठवण्यासाठीच काढली होती, असा घणाघात काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान चव्हाण यांनी मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशाची सध्या हुकुमशाहीकडे वाटचाल सुरु आहे. आपण दैनंदिन खर्चासाठी 2 हजार रुपयांची नोट वापरत नाही. मोदी सरकारने 2 हजार रुपयांची नोट काळा पैसा साठवण्यासाठीच काढली आहे, असं ते म्हणाले.

पवारांनी फुंकलं रणशिंग! कर्नाटकातील भाजपच्या पराभवाचा दाखला देत म्हणाले, आता संघर्षासाठी..

तसेच भाजप देशात जातीय दंगली घडवून आणण्याचं काम करीत आहे. देशात भाजपकडून धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. भाजपला आता सत्ता पुन्हा मिळणार नाही याची चाहुल लागली आहे. त्यामुळे ते काहीही करु शकतात. भाजप काय करु शकतं हे मला माहित नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

हवाई दलाचा मोठा निर्णय; वारंवार होणाऱ्या अपघातानंतर MIG-21 च्या उड्डाणावर बंदी

अलीकडेच 2 हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याबाबतची घोषणा आरबीआयकडून करण्यात आलीय. सर्वसामान्य माणूस दैनंदिन खर्चासाठी कधीच 2 हजार रुपयांची नोट वापरत नव्हता. याआधीही नोटबंदी केली होती. नोटबंदीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था उध्वस्त झाली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Karnataka : सत्ता कोणाचीही असो; जारकीहोळींच्या घरी एक मंत्रिपद हमखास असतेच!

दरम्यान, आता 2 हजारांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंतच चलनात असणार आहेत. याबाबत रिझर्व्ह बॅंकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या 2 हजारांची नोट चलनात चालणार असून 23 मे ते 30 सप्टेंबरदरम्यान, बॅंकामध्ये 2 हजारांच्या नोटा बदली करता येणार असल्याचं आरबीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे.

याआधीही 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानुसार चलनात असलेल्या 500 आणि 1 हजारच्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती. नोटबंदीच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून टीकेची तोफ डागण्यात येत आहे.

Tags

follow us