Download App

फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात लाचार मुख्यमंत्री! हर्षवर्धन सपकाळांनी फोडला ‘नैतिकतेचा’ बॉम्ब

Harshvardhan Sapkal Criticize Devendra Fadnavis : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी राज्य सरकारवर आणि भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर झालेल्या आरोपांनंतरही सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नाही, त्यामुळे सपकाळ यांनी (Congress) सत्ताधाऱ्यांच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर देखील बोचरी टीका करत म्हटलं की, फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात लाचार मुख्यमंत्री आहेत.

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात राज्य सरकारला मोठा झटका; आंबेडकर यांची पोस्ट करत माहिती

कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी

सपकाळ म्हणाले की, सरकारने आणि सरकारसोबत असलेल्या पक्षांनी नैतिकता गुंडाळून ठेवली आहे. कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात असूनही ते मंत्रिपदावर कायम आहेत, यावरून हे सरकार किती बेशरम आहे हे दिसून येतं.

यावेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्यावरही टीका केली. गोरंटयाल यांनी आजवर काँग्रेसने दिलेल्या संधींचा अवमान केला आहे. त्यांनी कधी माझ्याकडे नाराजी व्यक्त केली नाही. त्यामुळे आता त्यांनी निर्णय घेतलाय, तर त्यांना शुभेच्छा – चालल्या घरी सुखी राहा, असं कडवट शब्दांत सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली.

‘…वेदना होणारच!’ सहकाऱ्यांच्या पाठ फिरवण्यावर भास्कर जाधवांची खंत, पत्रात मनातलं सगळं बोलून टाकलं

त्रास देणारी यंत्रणा

एकनाथ खडसे प्रकरणावरही सपकाळांनी स्पष्ट भूमिका घेत भाजप नेत्यांवर निशाणा साधला. खडसेंना नाहक वेठीस धरणं चुकीचं आहे. एकीकडे त्यांना संकटमोचक म्हणून वापरणारे मंत्री, दुसरीकडे त्यांना त्रास देणारी यंत्रणा, हे योग्य नाही, अशी टीका करत त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अप्रत्यक्षपणे बोट ठेवलं. हर्षवर्धन सपकाळांचा हा पत्रकार परिषदेतला आक्रमक पवित्रा सध्या जालन्यात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. कोकाटे, गोरंटयाल आणि खडसे यांच्या राजकीय भूमिकांवर सपकाळ यांनी स्पष्ट मत मांडत भाजप सरकारच्या अंतर्गत संघर्षावर बोट ठेवलं आहे.

 

follow us