Download App

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरुच राहणार, मिळाली एक दिवसाची मुदतवाढ

मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाची मुदत आणखी एका दिवसासाठीवाढवली आहे.

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Movement Mumbai : मनोज जरांगे पाटील यांच्या (Jarange) मुंबईतील आझाद मैदानातील उपोषणाबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी एक दिवसाची परवानगी दिली होती. मात्र, मराठा आंदोलकांकडून आज दिवसभर झालेला घटनाक्रम पाहता आणखी काही कडक नियम व अटी पोलिसांकडून लावण्यात आले आहेत. त्यातच, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या परवानगीबाबत मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी चर्चा करुन 1 दिवसाच्या मुदतवाढीचा निर्णय घेतला.

मराठा आंदोलकांकडून आज करण्यात आलेल्या वाहतूक कोंडीबाबत काही नियम व अटींच्या पार्श्वभूमीवर उद्या त्यांच्या आंदोलनास परवागनी मिळणार की नाही, याची चर्चा सुरू असतानाचा आता त्यांना एक दिवसाची परवानगी देण्यात आली आहे. उद्याच्या आंदोलनासाठी परवानगी मिळावी यासाठी आझाद मैदान पोलिसांकडे जरांगे पाटील यांच्याकडून अर्ज करण्यात आला होता. दरम्यान, मनोज जरांगेंच्या आंदोलनास मुदतवाढीची परवानगी दिली असून आजचा प्रकार पाहता काही नियम व अटी त्यात असणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.

मोठी बातमी! जरांगे समर्थकांचा मंत्रालयाला घेराव; कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास मनाई

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळीच भाषण करताना आंदोलनाबाबत भूमिका मांडली होती. पोलिसांकडे परवानगी वाढवून मिळण्यासाठी विनंती अर्ज केल्याचेही सांगितले होते. त्यानुसार, त्यांच्या आंदोलनास मुदतवाढ देण्यात आली आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनात नियमा पेक्षा जास्त संख्येने मराठा बांधव उपस्थित होते, तर वाहतूक कोंडी होणार नाही याची हमी देऊनही वाहने रस्त्यात उभी करत वाहत कोंडी करण्यात आली. काही ठिकाणी जाणीवपूर्वक आंदोलक वाहने अडवून धरत होते.

आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनासाठी जे आंदोलन आले ते आता वाशीच्या दिशेने निघाले आहेत. बहुमतांशी आंदोलकांची तिथेच राहण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे, आज दिवसभर मुंबईत आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर ते आता वाशीच्या दिशेने निघाले आहेत. मुंबईत ईस्टर्न फ्री वे सुद्धा आता मोकळा झाला आहे, कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी राहिली नाही. एका मागे एक आंदोलकांच्या गाड्या आणि टेम्पो हे वाशीच्या दिशेने जात आहेत.

follow us