पुणे : मागील अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मवीर असं संबोधलं आणि तुम्हीच म्हणताय की छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, अजित पवारांना नव्याने इतिहास शिकविला पाहिजे असल्याच टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. पाटील आज पुण्यात विविध प्रश्नांबाबत पालकमंत्री चंद्रकात पाटील यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
विधी मंडळाच्या अधिवेशनामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक असल्याचं म्हंटलंय. त्यांनंतर त्यांच्या या वक्तव्यावर राज्यभरात विरोधकांकडून टीका, टीपणी आणि या वक्तव्याचे पडसाद उमटल्याचे दिसून आले.
त्यावर आता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांना शेकडो वर्ष त्यांना धर्मवीर म्हंटलं. आता तुम्हीच आता म्हणता ते धर्मवीर नव्हते. त्यामुळे आता
अजित पवार यांना नव्याने इतिहास शिकवला पाहिजे, असल्याचं म्हंटलंय. तसेच भाऊ तोरसेकर सकाळी म्हणाले की, हा जिहादी पक्ष आहे. संभाजी महाराज यांना धर्मवीर नाही तर काय म्हणायचे अजित पवार यांनी कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता केलेले वक्तव्य आहे.
दरम्यान, अजित पवारांनी केवळ चर्चेत राहण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल हे वक्तव्य केलं असावं, त्यांची ही पवार स्टाईल आहे जसं त्यांनी धरणाचे वक्तव्य केलं अगदी तसेच वक्तव्य केल्याची टीकाही त्यांनी केली आहे.