स्वत: ला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापा; शेतकऱ्यांच्या परिषदमध्ये बच्चू कडूंची जीभ घसरली

Bachchu Kadu यांनी राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद घेतली. यावेळी त्यांनी एक खळबळ जनक विधान केलं. ज्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Bachchu Kadu

Bachchu Kadu

Cut an MLA instead of ending yourself; Bachchu Kadu’s tongue slipped in the farmers’ conference : गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचा प्रचंड नुकसान झालं. अनेकांच्या जमिनी वाहून गेल्या. या पार्श्वभूमीवर सरकारने आर्थिक मदतही जाहीर केली आहे. मात्र विरोधकांनी तसेच शेतकऱ्यांनी अद्यापही मदत खात्यावर न पोहोचल्याने सरकारच्या विरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामध्ये प्रहार या संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद घेतली. यावेळी त्यांनी एक खळबळ जनक विधान केलं. ज्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

दिवाळीच्या दिवशी आपल्याला दुःखाची परिषद घ्यावी लागत आहे. तुम्ही विचारांची लढाई सोडून जाती-पातीची लढाई सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे. मात्र शेतकरी कोणत्याही जाती-धर्माचा असला तरी शेतकरी म्हणून एकत्र येऊ शकत नाही का? शेतकरी म्हणून आपल्याला लढता येईल का? याचा निळा, त्याचा भगवा, कुणाचा हिरवा, कुणाचा पिवळा या सर्व रंगाचे कापड आमच्या कापसापासून बनते. हा शेतकरी जो कापूस पिकवतो.

बिहार विधानसभा निवडणूक! नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार का?, भाजपच्या डोक्यात काय? वाचा सविस्तर

तसेच माझी शेतकरी नेते शरद जोशी यांनी शेतकऱ्यांसाठी जिवाचं रान केलं. ते कोणत्या जातीचे होते? हे मी सांगणार नाही. पण त्यांनी स्वतः शेती केली. त्यांचीही राख रांगोळी झाली. पत्नीने आत्महत्या केली आणि हिंगणघाटमध्ये शेतकऱ्यांनीच त्यांना निवडणुकीत पाडलं. मलाही शेतकऱ्यांनीच वाढलं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही निवडणुकीत पराभूत करण्यात आलं. त्यामुळे शेतकरी आज आत्महत्या करत आहेत. पण त्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापावं? असं मला बच्चू कडू यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.

राष्ट्रीय पुरस्कारानंतर त्रिशा ठोसर पुन्हा भेटीला येणार,’पुन्हा शिवाजीराजे भोसले’मध्ये छोट्यांचा मोठा धमाका!

दरम्यान त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. यावर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की बच्चू कडू यांनी बालिशपणा सोडून सामाजिक काम करावे. नाहीतर कापून टाकू, झाडून टाकू हे प्रकार त्यांच्यासोबत होऊ नये.

Exit mobile version