Download App

शिक्षकांची चिंता वाढली; D.ED अभ्यासक्रम बंद होण्याची शक्यता

  • Written By: Last Updated:

D. ED Course Maharashtra :  शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असणारा डीएड कोर्स बंद होण्याची शक्यता आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा डीएड अभ्यासक्रम बंद होण्याची शक्यता आहे. बारावीनंतर आता 4 वर्षांचा इंटिग्रेटेड बी ए़़ड डिग्री कोर्स असणार आहे. त्यामुळे डीए़ड अभ्यासक्रम बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोठी बातमी ! पुण्यात नऊ ठिकाणी ईडीची छापेमारी.. मुश्रीफांच्या अडचणी वाढणार

बारावीनंतर 4 वर्षांचा हा कोर्स असणार आहे. बारावीनंतर थेट हा डिग्रीचा कोर्स आता विद्यार्थ्यांना करता येणार आहे. जर तुमचा तीन वर्षांचा डीग्री कोर्स झाला असेल तर तुम्ही दोन वर्षांचा हा बीएड कोर्स करु शकता. तसेच जर तुमचा चार वर्षांचा डीग्री कोर्स झाला असेल किंवा तुमची मास्टर डीग्री झाली असेल तर तुम्ही 1 वर्षाचा हा बीएड कोर्स करु शकता.

PM Modi : भाजप पक्ष हा बोगस पदव्यांची फॅक्ट्री, संजय राऊतांचा घणाघात

मात्र याबाबतची अंमलबजावणी कधी होणार हे अद्याप कळू शकलेले नाही. यावर्षी हा अभ्यासक्रम लागू होणार की पुढील वर्षी हा अभ्यासक्रम लागू होणार हे अद्याप कळू शकलेले नाही. शिक्षण विभागाकडून अद्यापु याविषयीची कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे जेव्हा हा अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय होईल तेव्हा या निर्णयाची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात येईल.

Tags

follow us