Download App

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नाव ‘सुवर्णाक्षरांनी लिहिणार’ ; स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं मोठं विधान

Eknath Shinde’s name will be written in golden letters : ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य (Shankaracharya) स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी एक मोठी घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) नाव चांदीच्या पानावर सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात येईल, असं त्यांनी जाहीर केलंय. हा सुवर्णाक्षर ग्रंथ त्यांच्या प्रोत्साहनात्मक योजनांचा भाग आहे. चांगले काम करणाऱ्यांचे नाव ताम्र, रौप्य किंवा सुवर्ण अक्षरांत लिहिण्याच्या (Swami Avimukteshwaranand Statement) परंपरेनुसार कार्य केलं जातंय.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी स्पष्ट केलंय की, ही कोणतीही नवीन मोहीम नाही. ही आमची पूर्वीपासून चालत आलेली वृत्ती आहे. जे लोक समाजात उपयुक्त कार्य करतात, त्यांना योग्य मान मिळावा म्हणून अशा रुपात नाव लिहिले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले. शिंदे सरकारने गोमातेचा ‘राज्यमाता’ म्हणून गौरव केला. हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केलंय. पुढे सांगितले की या निर्णयाबद्दल अचूक श्रेय एकनाथ शिंदे यांनाच जाते. कार्य करणाऱ्यांचे नाव लिहण्याला विरोध केल्यास, तर्क हवा. काम असल्यासच नाव लिहिले जाते, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन भाजप अन् राज ठाकरेंकडे… रामदास मदमांचा मोठा गौप्यस्फोट

कोणत्याही राजकीय पक्षाशी

कोणत्याही राज्याच्या किंवा मुख्यमंत्रीच्या कामावर आधारित नामांकन करता येते, यात काही चुकीचे नाही, असं देखील स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी स्पष्ट केलंय.शिवसेनेच्या विभाजनानंतरही, ज्यांच्या कृतींमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ठेवलेल्या मार्गाचे प्रामुख्याने पालन होतो, त्यात खरी शिवसेना आहे, असे स्पष्ट करत त्यांनी म्हटलंय की ते कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नाहीत.

Eng vs Ind 4th Test : चौथ्या कसोटीपूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल, ‘हा’ भारतीय खेळाडू बाहेर

राजकीय खेळ

राज ठाकरे यांनी केलेल्या “मुंबईला गुजरातशी जोडण्याच्या” आरोपांवर त्यांनी सवाल उपस्थित केला. गुजरातची स्वतःची भाषा आणि राज्यव्यवस्था महाराष्ट्रापासून स्वतंत्र आहे. मग हिंदी नावाने मुंबईगुजरात योजनेचा अर्थ कसा लागू शकतो? हे राजकीय खेळ आहेत. हा पूर्णपणे राजकीय आखाडा आहे. दोन्ही बाजूंनी हिंसात्मक भाषेचा वापर केला आहे, ज्याला बुद्धिमत्ता आधार देऊ शकत नाही. भाषा आई किंवा गुरूकडून शिकवली जाते, हिंसा नाही. राजकारण्यांनी भाषेत हिंसा जोडणं चुकीचं आहे, असं स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी टीव्हीनाईन सोबत बोलताना म्हटलंय.

 

follow us