Download App

ब्रेकिंग : बॉम्ब स्फोटासाठी शुक्रवार पवित्र; दिल्ली उच्च न्यायालयानंतर मुंबई हायकोर्ट उडवण्याची धमकी

दिल्ली उच्च न्यायालयानंतर आता मुंबई उच्च न्यायालयालाही बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.

  • Written By: Last Updated:

Bombay HC gets bomb threat email : दिल्ली उच्च न्यायालयानंतर आता मुंबई उच्च न्यायालयालाही बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. उच्च न्यायालयात धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे, त्यानंतर न्यायालय परिसर रिकामा करण्यात येत आहे. या धमकीनंतर मोठी खळबळ उडाली असून, घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक दाखल झाले आहे. मुंबई हायकोर्टाला देण्यात आलेल्या धमकीपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आवारात तीन बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल आला होता तसेच दुपारी २ वाजेपर्यंत उच्च न्यायालय रिकामे करा असे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता हायकोर्टातील रजिस्टर ऑफिसमध्ये मेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे.  या धमकीने खळबळ उडाली आहे.

 

बॉम्ब स्फोटासाठी शुक्रवार पवित्र

दिल्ली उच्च न्यायालयाला मिळालेल्या ईमेलमध्ये स्पष्टपणे लिहिले होते की, बॉम्ब स्फोटांसाटी शुक्रवार पवित्र, त्यासाठी पाकिस्तान-तामिळनाडू यांची मिलीभगत… जज रुम, कोर्ट परिसरात तीन बॉम्ब ठेवण्यात आले असल्याचेही नमुद करण्यात आल्याचे समजत आहे. दुपारी वाजेपर्यंत खाली करा…सध्या दिल्ली आणि मुंबई हायकोर्टाला आलेल्या धमकीबाबत सायबर सेलची टीम धमकीचा मेल कुठून आणि कुणी पाठवला, त्यामागे कोण कोण सहभागी आहेत याचा युद्धपातळीवर शोध घेत आहे. 

पाठवण्यात आलेल्या धमकीच्या ईमेलमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, एका व्यक्तीने पाकिस्तानच्या आयएसआयशी संपर्क साधला आहे आणि १९९८ मध्ये पाटणा येथे झालेल्या बॉम्बस्फोटांची पुनरावृत्ती करण्याचा कट रचला आहे. एवढेच नव्हे तर, राजकीय नेते आणि आरएसएसबद्दलही आक्षेपार्ह गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत. यासोबतच एका मोबाईल नंबर आणि एका कथित आयईडी डिव्हाइसबद्दलही माहिती देण्यात आल्याचे समजत आहे. 

सर्व सुनावणी स्थगित

मुंबई हायकोर्टाला आलेल्या बॉम्बच्या धमकीनंतर कोर्ट इमारत आणि परिसर पूर्णपणे रिकामा केला जात असून, सुरक्षेच्या कारणास्तव सर्व सुनावण्यांना स्थगिती देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

follow us