Eknath Shinde Special Session : पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. बहुमत मिळाल्यानंतर महायुतीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ५ डिसेंबर रोजी शपथ घेतली. आज विशेष अधिवशनाचा शेवटचा दिवस आहे. (Eknath Shinde ) विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. त्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यानी भाषण केलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनात शिंदेंनी जोरदार भाषण केलं.
मोठी बातमी! विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर; आवाजी मतदानाने झाली निवड
गेल्या अडीच वर्षांत राहुल नार्वेकरांनी केलेलं काम आपल्यासमोर आहे. आम्ही म्हणालो होतो की २०० पेक्षा आमदार निवडून आणू नाहीतर शेती करायला जाईन. तोही शब्द आम्ही पूर्ण केला. त्यानंतर दादा आले. त्यामुळे बोनस आला, आम्ही २३७ झालो. लोकशाहीत आपण महायुतीला प्रचंड यश दिलं, विकासाचं आणि प्रगतीचं नवं पर्व सुरू झालं. गेल्यावेळी सभागृहात विरोधी पक्ष चांगल्या कामाला पाठिंबा देत होतं. सरकार चुकत असेल तर कान धरण्याचं काम केलं. आता तर विरोधी बाकावरची संख्या चिंताजनक आहे. असं व्हायला नको होतं असंही शिंदे म्हणाले आहेत.
अभ्यासपूर्वक निर्णय दिला
राहुल नार्वेकर साताऱ्याचे जावई आहेत. सातारा माझं गाव आहे. २०२२ मध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केलं. तो कसोटीचा काळ होता. सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची जबाबदारी टाकली होती. अनेक ज्येष्ठ वकिल इकडे यायचे. सर्व कायद्याचा किस पाडायचे, अशा परिस्थितीत अत्यंत सखोल अभ्यास करून सचोटीने आणि शांतपणे निर्णय दिला. संयम ठेवला आणि न्यायाचा काटा चुकीच्या बाजूला झुकत नाही हे दाखवून दिलं. आपण दिलेला निर्णय योग्यच होता. कारण जनतेनेही तोच न्याय दिला असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.
आता निर्जिव यंत्रणेवर आरोप
लोकसभेला विरोधकांनी बॅलेटपेपरवर फेरमतदान का मागितलं नाही. तेव्हा बुलेटवर सर्वजण स्वार झाले, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली. किती राज्य तुम्ही जिंकलात, हरलो की ईव्हीएमवर आरोप करायचा. गेल्या अडीच वर्षांत तुम्ही आमच्यावर आरोप करत होतात, आता त्या निर्जिव ईव्हीएमवर आरोप करत आहात असा प्रतिहल्लाही शिंदे यांनी यावेळी केला.