Devendra Fadanvis : नागपूरमध्ये एकही बस ‘डिझेल’वर धावणार नाही… आणखी २५० इलेक्ट्रिक बस देणार!

नागपूर : नागपूर शहरात यापुढे एकही बस डिझेल, पेट्रोलवर धावणार नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने यापुढे फक्त इलेक्ट्रिक बस धावतील. त्यासाठी कोणत्याही प्रकारे भाडेवाढ करण्यात येणार नाही. नागपूर महापालिकेला राज्य सरकार सर्वोतोपरी मदत करेल. आता आम्ही वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वातानुकूलित (AC) इलेक्ट्रिक बस दिल्या आहेत. अत्यंत आरामदायी आणि सुखकर नागपूरकरांचा प्रवास होणार आहे. तसेच भविष्यात आणखी २५० […]

DCM Devendra Fadnavis reaction on Kolhapur Riots

DCM Devendra Fadnavis reaction on Kolhapur Riots

नागपूर : नागपूर शहरात यापुढे एकही बस डिझेल, पेट्रोलवर धावणार नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने यापुढे फक्त इलेक्ट्रिक बस धावतील. त्यासाठी कोणत्याही प्रकारे भाडेवाढ करण्यात येणार नाही. नागपूर महापालिकेला राज्य सरकार सर्वोतोपरी मदत करेल. आता आम्ही वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वातानुकूलित (AC) इलेक्ट्रिक बस दिल्या आहेत. अत्यंत आरामदायी आणि सुखकर नागपूरकरांचा प्रवास होणार आहे. तसेच भविष्यात आणखी २५० इलेक्ट्रिक बस देणार आहे. शहरातील सर्व बस स्थानक अत्याधुनिक केली जाणार आहेत, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना दिले.

राज्य सरकारच्या मदतीने नागपूर महापालिकेला आणखी २५० इलेक्ट्रिक बस प्रदान करण्यात आल्या. या बसच्या शुभारंभप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी इलेक्ट्रिक बसमधून प्रवास केला. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन यांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहरात चांगली सार्वजनिक व्यवस्था करत आहोत. तसेच यासाठी कोणत्याही प्रकारे भाडेवाढ केली जाणार नाही. आहे त्या भाड्यात चांगली सुविधा देणार आहे.

Eknath Shinde : आधीचं सरकार ‘सायलेंट’, आताचे ‘अलर्ट’ मोडवर!… कोकणासाठी केल्या तीन महत्वपूर्ण घोषणा!

आता आमचा प्रयत्न असा आहे की येत्या काळामध्ये एकही पेट्रोल डिझेलची बस नागपूर शहरात राहणार नाही. सगळे इलेक्ट्रिक बसेस आणणार आहोत. नागपूर महानगरपालिकेला राज्य सरकारच्या यासोबत सगळी मदत केली जाणार आहे. तसेच बस स्टँड आम्ही चांगले आधुनिक करणार आहोत. त्यासोबत डिजिटल माध्यमाचा उपयोग करून शहरात किती बस स्थानक आहेत. अशा सर्व बस स्थानकावर प्रवाशांना सगळ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रवाशाला कुठून कुठे जायचंय असं जर टाकलं तर त्याला बस रूट कळणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण आपण एक डिजिटल नेटवर्क देखील तयार करत आहोत, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Exit mobile version