Devendra Fadanvis : शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित महसूल परिषदेला संबोधित केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी कृषीफीडर सौरउर्जेवर आणण्याचे काम सुरु आहे. सोलर योजना अधिक प्रभावी पणे राबवणार आहे. सोलर योजनेच्या माध्यमातून 4000 मे. वॅ. वीज सौरउर्जेवर आणलेजात आहे. यामुळे अधिक प्रमाणात वीज उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल. तसेच पुढे […]

Untitled Design (2)

solar panel

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित महसूल परिषदेला संबोधित केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी कृषीफीडर सौरउर्जेवर आणण्याचे काम सुरु आहे. सोलर योजना अधिक प्रभावी पणे राबवणार आहे. सोलर योजनेच्या माध्यमातून 4000 मे. वॅ. वीज सौरउर्जेवर आणलेजात आहे. यामुळे अधिक प्रमाणात वीज उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल.

तसेच पुढे फडणवीसांनी जलयुक्त शिवार योजना सुरु करणार आहोत ही योजना मिशन मोड वरती आहे. ही योजना अधिक प्रभावीपणे चालवणार आहे तसेच आवास योजनेची गती वाढवणार ही देखील मिशन मोड वरती आहे. ज्या योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मागे पडल्या त्या योजनांना सांजवीनी देण्याचे काम आम्ही करणार आहोत.

Devendra Fadanvis पहाटेचा शपथविधी : उर्वरित सत्य सुद्धा बाहेर येईल

तसेच पुढे फडणवीस महसूल विभाग वरती बोलताना म्हणाले, अतिशय चांगली सिस्टीम महसूल विभागात आहे. विखे पाटील महसूल मंत्री झाल्यापासून महसूल विभागाचा कारभार अधिक पारदर्शक झाला आहे. या महसूल परिषदेत मोजणीच्या संदर्भातील चांगली व्यवस्था, वाळूसंदर्भातील अडचणी सोडविण्याचा तसेच व्यवस्था अधिक पारदर्शी करण्यासंदर्भातील पद्धतींवर चर्चा झाली आहे.

Exit mobile version