Devendra Fadnavis : मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेस मान्यता; फडणवीस सरकारने घेतले 4 मोठे निर्णय 

Devendra Fadnavis Government Cabinet Decisions :  राज्यातील फडणवीस सरकारने आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 4 मोठे निर्णय घेतले आहे.

Devendra Fadnavis Government Cabinet Decisions

Devendra Fadnavis Government Cabinet Decisions

Devendra Fadnavis Government Cabinet Decisions :  राज्यातील फडणवीस सरकारने आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 4 मोठे निर्णय घेतले आहे. या बैठकीत मंत्रिमंडळाने सामान्य प्रशासन विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वित्त विभाग आणि उद्योग विभागासाठी निर्णय घेतले आहे.  राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेस मान्यता देण्यात आली आहे.

माहितीनुसार आता, 13 विभागांची पूनर्रचना यामुळे एकाच विभागात असलेल्या दोन उपविभागांचे स्वतंत्र विभाग होणार आहे. आता 33 प्रशासकीय विभाग होते त्यांची संख्या 10 ने वाढून 43 करण्यात येणार आहे. नवीन पद निर्मिती होणार नाही पण विभागांना आता सुलभपणे काम करता येईल अशा पद्धतीने कामकाजांची विभागणी करण्यात येणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

तसेच राज्यातील नवीन महाविद्यालयांना अंतिम मान्यता विस्तारीकरणात नवीन विद्याशाखा, अभ्यासक्रम व नवीन विषय, तुकडी यांना मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Devendra Fadnavis Government Cabinet Decisions) घेण्यात आला आहे.

तर केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मधील तरतुदींना सुसंगत आणि सूसत्रतेसाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करण्यास आमि महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2026 मध्ये सुधारणा करण्यास देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

उज्ज्वला योजनेत सिलिंडरचा कोटा कमी का? सरकारने सांगतिलं मुख्य कारण-

या बैठकीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडसाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करण्यात येत आहे. अध्यादेश काढण्यास तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मध्ये सुधारणा करण्यास देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

Exit mobile version