Download App

लाखोंचा दंड पण बंगला सुटेना; मंत्रिपद चार महिन्यांपुर्वीच गेले बंगला धनंजय मुंडेंकडेच, भुजबळांची प्रतिक्षा कायम

Dhananjay Munde यांचं मंत्रिपद जाऊन चार महिने उलटून गेले तरी त्यांनी त्यांना मिळालेला सातपुडा हा शासकीय बंगला सोडलेला नाही.

Dhananjay Munde not Leaving Banglow after lost ministerial post Chhagan Bhujbal is waiting : राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या गटाचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेल्या चार महिन्यांपुर्वीच गेले आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड हा त्यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांना हे पद गमवावं लागलं. मात्र चार महिने उलटून गेले तरी देखील धनंजय मुंडे यांनी त्यांना मंत्री असताना मिळालेला सातपुडा हा शासकीय बंगला सोडलेला नाही.

सावधान! ‘या’ दोन कारणांमुळे महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका

दरम्यान त्यांनी हा बंगला सोडला नसल्याने नव्याने मंत्री झालेल्या छगन भुजबळांना हा बंगला मिळणार आहे. मात्र धनंजय मुंडे यांनी हा बंगला अद्यापही सोडलेला नसल्याने भुजबळ हे प्रतिक्षेत आहेत. मुंडे यांनी 4 मार्च रोजी राजीनामा दिल्यानंतर त्यानी 15 दिवसांत बंगला सोडने अपेक्षित होते. तसेच त्यानंतर मंत्री झालेल्या भुजबळांना तो बंगला मिळणार आहे. मात्र मुंडेंनी बंगला न सोडल्याने त्यांना तो मिळत नाही.

तुम्ही खरे भारतीय असता तर…; भारतीय सैन्यावरील विधानावरून SC ने राहुल गांधींना झापले

दरम्यान मंत्र्यांनी अशाप्रकारे मंत्रिपद गेल्यानंतर देखील शासकीय निवासस्थान न सोडल्यास त्यांना दंड देखील आकारण्यात येतो. त्यामुळे आता माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेल्या चार महिन्यांपुर्वीच गेले आहे. मात्र चार महिने उलटून गेले तरी देखील धनंजय मुंडे यांनी त्यांना मंत्री असताना मिळालेला सातपुडा हा शासकीय बंगला सोडलेला नाही. त्यामुळे त्यांना देखील दंड आकारण्यात आला आहे. हा दंड तब्बल 42 लाखांवर गेला आहे.

फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, धनंजय मुंडे मला दोनदा नाही, तर तीनवेळा भेटले…

मुख्यमंत्री फडणवीसांनी शुक्रवारी (१ ऑगस्ट) नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. धनंजय मुंडेंनी दोन भेटी घेतल्याच्या चर्चांवर फडणवीसांना प्रश्न विचारला असता त्यांनी धनंजय मुंडेंनी माझी तीनवेळी भेट घेतल्याचा खुलासा केला. ते म्हणाले, तुमची माहिती अर्धवट आहे. त्यांनी माझी तीन वेळा भेट घेतली आहे. ती वेगवेगळ्या कारणांनी घेतली होती. धनंजय मुंडेंसोबतच्या कोणत्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही, मंत्रिमंडळाची चर्चा मी, अजितदादा आणि एकनाथ शिंदे करतो, असं फडणवीस म्हणाले. त्यामुळं सध्यातरी मुंडे यांचं मंत्रिमंडळातील चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

follow us