Download App

अजित पवारांनी तक्रार केल्याचा धनंजय मुंडेंचा दावा; फडणवीसांकडून मात्र पाठराखण, काय आहे प्रकरण

मुस्लिमांविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात अजित पवारांनी दिल्लीतील भाजपच्या नेत्यांकडे तक्रार केल्याची माहिती आहे.

  • Written By: Last Updated:

Dhananjay Munde on Nitesh Rane Statement : अजित पवारांनी वाचाळविरांना दम दिल्यानंतर आता महायुतीतून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. वाचाळवीरांनी थोडीशी मर्यादा पाळावी, कुठेही वेडंवाकडं विधानं (Nitesh Rane) करून मुख्यमंत्री वा घटकपक्षांना अडचणीत आणू नये असं अजित पवार म्हणाले आहेत. दरम्यान, अजित पवारांनी भाजपमधील वाचाळविरांची तक्रार दिल्लीतील वरिष्ठांकडे केल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली. तर अजित पवारांनी कुठे तक्रार करायची ते करू द्या अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.

IIFL Finance : आरबीआयचा IIFL फायनान्सला मोठा दिलासा; गोल्ड लोन व्यवसायावरील बंदी मागं

राष्ट्रवादीत तीव्र नाराजी

मुस्लिमांविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंसारख्या भाजपच्या नेत्यांविरोधात अजितदादांच्या राष्ट्रवादीनं अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती आहे. महायुतीत असूनही धर्मनिरपेक्ष राजकारण करणाऱ्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत याबद्दल तीव्र नाराजी असल्याचं समजतंय. पण नितेश राणेंनी मात्र यावरून अजितदादांनाच चॅलेंज दिलंय. अजितदादांना कुठं तक्रार करायची ते करू द्या, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे असं आमदार नितेश राणे म्हणाले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र नितेश राणेंची पाठराखण केल्याचं दिसतंय.

अजितदादांची दिल्लीच्या नेत्यांकडं तक्रार

भारतीय पक्षातील काही नेत्यांकडून अशा प्रकारची वक्तव्य केली जात असून, त्याबद्दल अजित दादांनी केंद्रातील नेत्यांकडं याबाबत नाराजी व्यक्त केली आहे ही माहिती खरी असल्याचं राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली. दरम्यान, अजितदादांच्या तक्रारीवर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, अजितदादांना कुठं तक्रार करायची ते करू द्या. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आम्हाला वरिष्ठ नेत्यांनी काही सांगितलं तर तसे वागू. जे आमची दिल्लीला तक्रार करतात त्यांनी गणेश मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीवर आक्षेप घेत त्याचा निषेध करायला हवा होता. पण तसं त्यांनी केलं नाही.

अजितदादांचा वाचाळवीरांना दम

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतल्या वाचाळवीरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच दम दिला. वेडंवाकडं विधान करून घटकपक्षांना अडचणीत आणू नका, अशा शब्दांत दादांनी कान टोचलेत. भाजप आणि शिवसेनेतल्या अनिल बोंडे आणि संजय गायकवाड यांच्यासारख्या नेत्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात बेताल वक्तव्य करून वादाला तोंड फुटलंय. त्यामुळे अजितदादांनी लाडकी बहीण कार्यक्रमात अशा नेत्यांना कडक शब्दांत ताकीद दिलीय.

Stock Market : देशांतर्गत शेअर बाजाराने केला नवा विक्रम, सेन्सेक्सने पहिल्यांदाच 84 हजारांचा टप्पा पार केला

फडणवीसांकडून पाठराखण

अजितदादांनी वाचाळवीरांची तक्रार केल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अजित दादा यांनी तक्रार केली का, कोणाकडे तक्रार केली याबद्दल माहिती नाही. मात्र नितेश राणे हे हिंदुत्ववादी नेते असून ते त्यासाठी काम करत आहे. नितेश राणे बोलतात त्याचा कधी कधी वेगळा अर्थ निघतो. यासाठी स्वतः नारायणराव राणे यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे आणि मी सुद्धा त्यांच्याशी चर्चा केली आहे. यापुढे ते काळजी घेतील.

follow us