Download App

राष्ट्रवादीच्या दोन रूपालींमध्ये रंगला ‘आमदारकीवरुन’ वाद …. 

रुपाली पाटील ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यात आमदार होण्यावरुन वादाला सुरुवात झाली आहे.

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thobare). पहिल्या रुपाली म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि दुसऱ्या रुपाली म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रदेश प्रवक्त्या. दोघींना जोडणारा समान धागा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून दोघींनाही ओळखले जाते. याच दोघी आता आमदारकीवरुन आमने-सामने आल्या आहेत. एकाच व्यक्तीला किती पद देणार असे म्हणत एका रुपालीने दुसऱ्या रुपालीला कडाडून विरोध केला आहे. (dispute has started between Rupali Patil Thombre and Rupali Chakankar over becoming an MLC)

नेमका काय आहे हा वाद? आणि अजितदादा कसा तोडगा काढणार? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांचा तिढा जवळपास सुटल्यात जमा आहे. सरकारी वकिलांनी येत्या काही दिवसांत प्रक्रिया पूर्ण करू असे आश्वासन मुंबई उच्च न्यायालयाला दिले होते. या अनुषंगाने आता हालचालींना वेग आला आहे. न्यायालयातील निकालानंतर लगेचच मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन राज्यपाल महोदयांना या नावांची शिफारस पाठवली जाणार आहे. त्यानंतर येत्या 14 तारखेला या 12 आमदारांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. विधानसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी या १२ आमदारांची नियुक्ती व्हावी असा या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा अट्टाहास आहे.

जयदीप कुटुंबाला भेटण्यासाठी आला अन् अलगद अडकला… पत्नीनेच पोलिसांना दिली टीप

दरम्यान, या 12 पैकी भाजपने सहा जागांवर दावा केला आहे. तर उर्वरित सहापैकी शिवसेनेला तीन आणि राष्ट्रवादी तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. यात भाजप आणि शिवसेनेमधील संभाव्य नावे अद्याप समोर आलेली नाहीत. पण राष्ट्रवादीची तीन संभाव्य नावांबाबत माध्यमांमध्ये जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार आनंद परांजपे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या नावांची शिफारस केली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने शिफारस केल्या जाणाऱ्या नावांवर शिक्कामोर्तब झालेले नाही, मात्र हीच नावे अंतिम असल्याची माहिती आहे.

निवडणुकीआधी महाराष्ट्राची चांदी! ७६ हजार कोटींची गुंतवणूक अन् १२ लाख रोजगार

यावरुनच सध्या दोन रुपालींमध्ये वाद पेटला आहे. सुरुवातीला सांगितले त्याप्रमाणे चाकणकर या सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षाही आहेत. यावर बोट ठेवत एकाच महिलेला किती पदे देणार? असा जळजळीत सवाल रुपाली पाटील ठोंबरे यांनी विचारला आहे.

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ठोंबरे म्हणाल्या, “एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आमचे मा.अजित दादा न्याय नक्की देतील असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदे देणार? काल पासून बातमी वाचत आहे, बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही असे सांगितले. पक्षाला कळकळीची विनंती असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इतरही महिला आहेत त्या सक्षमतेने, दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तुत्वान महिला खूप आहेत त्या सक्षम, काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा इतर महिलांना समान संधी द्यावी. ही विनंती असेल”, असेही ठोंबरे म्हणाल्या आहेत.

त्यामुळे आता नेमके कोण आमदार होणार? हे येत्या काही दिवसात कळून येईलच. पण चाकणकर यांना संधी मिळाल्यास ठोंबरे यांच्या पदरात काय पडणार? की चाकणकर यांना विरोध करुन त्याबदल्यात काही तरी मोठे पदरात पाडून घ्यायचे अशी काही ठोंबरे यांची रणनीती आहे का? या सवालाचे उत्तरही येत्या काही दिवसात कळून येईल.

follow us