Download App

Disqualification Mla : दोन्ही गटांत तुफान फटकेबाजी; पुढील सुनावणी ‘या’ तारखेला

Disqualification Mla : सर्वोच्च न्यायालयाने टाईमलाईन दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज पार पडली. या सुनावणीदरम्यान, शिंदे-ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. या युक्तिवादानंतर पुढील सुनावणी येत्या 21 नोव्हेंबरला पार पडणार आहे. दरम्यान, सुनावणीच्यावेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यात आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये जोरदार गोंधळ झाल्याचंही दिसून आलं आहे.

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ द्या’मधील अंकुर वाढवे लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार

सुनावणीनंतर शिंदे गटाच्या वकीलांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते म्हणाले, आज सुनावणीदरम्यान, कागदोपत्रे सादर करण्याच्या अर्जावर युक्तीवाद झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सर्व ऑर्डर पास केल्या असून कागदोपत्रे रेकॉर्डवर घेतलेली आहेत.

सामाजिक अस्थिरतेचा नाट्य संमेलनाला फटका; मुहूर्तमेढीचा कार्यक्रम रद्द, स्वागताध्यक्षांचा राजीनामा

16 नोव्हेंबरपर्यंत कागदोपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून 21 तारखेला पहिला साक्षीदार तपासला जाणार आहे. त्यापुढेही अपात्र आमदारांच्या प्रकरणाची सुनावणी सुरुच राहणार असल्याचं शिंदे गटाच्या वकीलांनी स्पष्ट केलं आहे.

Aishwarya Rai Birthday : मॉडेलिंगपासून करिअरला सुरूवात केली, आज करोडोंची मालकीन झाली…

इथं काय तमाशा सुरु आहे का?
कागदोपत्रे सादर करण्याच्या अर्जावर युक्तिवाद सुरु असतानाच शिंदे गटाच्या वकीलांनी गोंंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत शिंदे गटाच्या वकीलांवर चांगलेच संतापल्याचं दिसून आले आहेत. इथं काय तमाशा सुरु आहे का? असा सवाल देवदत्त कामत यांनी उपस्थित केला आहे.

Iphone : हेरगिरी अन् हॅकिंगपासून असं संरक्षण करा; आयफोनच्या ‘या’ फिचरबद्दल माहितीये का?

आमदार अपात्रता सुनावणीदरम्यान, व्हीपबाबतही मेलवरुन दोन्ही गटाच्या वकीलांकडून दावे-प्रतिदावे करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. आम्हाला कोणताही मेल आला नसल्याचा दावा शिंदे गटाच्या वकीलांनी केला आहे. तसेच येत्या 16 नोव्हेंबरपर्यंत याचिकेसंदर्भातील सर्व कागदोपत्रे सादर करावी लागणार आहेत.

Tags

follow us