District Bank Election Result : अहिल्यानगर, सातारा आणि सांगली जिल्हा बँकसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून आतापर्यंत महत्त्वाचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. या निवडणुकीत काही दिग्गजांनी बाजी मारली आहे तर काहींना पराभव स्वीकारावा लागला आहे.
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) विजयी झाले आहे. त्यांनी पारनेरमधून भाजप नेते राहुल शिंदे (Rahul Shinde) यांचा पराभव केला आहे. खासदार लंके यांना 64 तर राहुल शिंदे यांना 40 मते मिळाली आहे. दुसरीकडे आमदार तनपुरे यांनी देखील राहुरीतून बाजी मारली आहे. त्यांनी सत्यजीत कदम यांचा पराभव केला आहे. तनपुरे यांना 89 तर सत्यजीत कदम यांना 19 मते मिळाली आहे.
तर दुसरीकडे कर्जतमधून विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांच्या गटातील उमेदवार ज्योती प्रकाश शिंदे (Jyoti Prakash Shinde) यांना 54 मते मिळाली तर तुषार अंबादास पिसाळ यांना 20 मते मिळाली आहे. तर अकोलेमध्ये आमदार किरण लहामटे (Kiran Lahamte) यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा या निवडणुकीत पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. आमदार किरम लहामटे यांना 36 तर संजीवनी शिंदे यांना 49 मते मिळाली आहे.
तर दुसरीकडे सातारा जिल्हा बँक निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी बाजी मारली आहे. पाटण सोसायटीतून त्यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी या निवडणुकीत भाजप नेते सत्यजितसिंह पाटणकरांचा पराभव केला आहे. या विजयसह पाटण सोसायटीत देसाई यांना 42 वर्षांनी विजय मिळाला आहे. तर राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी देखील या निवडणुकीत बाजी मारली आहे. त्यांचा माण सोसायटीमधून विजय झाला आहे. त्यांनी त्यांचे बंधू शेखर गोरे यांचा पराभव केला आहे. निवडणुकीत जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांना 53 तर शेखर गोरे यांनी सात मते मिळाली आहे.
विखेंना धक्का, अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत खासदार लंकेंनी मारली बाजी –
https://t.co/yaiSBgY7Qb
@INilesh_Lanke @drsujayvikhe #MaharashtraPolitics #ahilyanagar #ahilyanagardistrictbank— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) November 3, 2026
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक राहुरीतून आमदार प्राजक्त तनपुरे विजय-
सांगली जिल्हा बँक निवडणूक आ. गोपीचंद पडळकर 20 मतांनी विजयी
सांगली जिल्हा बँक निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांचा 20 मतांनी विजय झाला आहे. तर तासगाव सोसायटी गटातून माजी खासदार संजय काका पाटील यांचा दोन मतांनी विजय झाला आहे. त्यांनी माजी आमदार सुमन ताई पाटील यांचा पराभव केला आहे. तर मिरज सोसायटी गटातून खासदार विशाल पाटील समर्थक अण्णासाहेब कोरे विजयी झाले आहे. त्यांना 46 मते मिळाली आहे.
