Solapur Crime: सोलापूर शहरातुन एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. सोलापूर शहरातील डीजे ऑपरेटर यांचा विजापूर येथे तुंबळ मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली. (Solapur Police) प्रमोद अंबादास शेराल वय वर्ष 32 राहणार भवानी पेठ सोलापूर असे मृत्युमुखी पडलेल्या डीजे ऑपरेटर युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद हा दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी इंडी तालुका पासून दहा किलोमीटर अंतरावरील एका गावाच्या ठिकाणी जखमी अवस्थेत सापडला होता, त्या जखमी अवस्थेत इंडी येथील एका दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना सोलापूर शहरातील सिविल हॉस्पिटल येथे आणण्यात आले होते. परंतु अखेर त्याचा मृत्यू दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
तसेच सदरचा युवक हा कर्नाटक येथे गणपती मिरवणुकीत डीजे वाजवण्यासाठी गेला होता. आणि तिथेच तो जखमी अवस्थेत मिळून आला होता आणि अखेर यात या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. परिवार व नातेवाईकांनी आता त्या युवकाला घेऊन जाणाऱ्या डीजे माणसावर आरोप होत असेल नेमकी घटना कशी घडली याचा शोध लावायला पाहिजे ही मागणी करत आहे.
Khamgaon-Malkapur accident : रस्त्याच्या कडेला गाढ झोपेत असतांना ट्रकने चिरडले, चौघांचा मृत्यू
दरम्यान आज असेल हॉस्पिटल येथे कर्नाटकचे पोलीस अधिकारी दाखल झाले असून सदरच्या युवकाच्या पंचनामाच्या घटनास्थळी एकच गर्दी होत आहे. नेमकं ही घटना कशी घडली ? हत्या की आत्महत्या ? याचा नेमका अंदाज कर्नाटकचे पोलिसांना न मिळाल्याने या घटनेचा सस्पेन्स कायम ठरला आहे. दरम्यान कर्नाटकचे पोलीस अधिकारी सिविल हॉस्पिटल मधील डॉक्टराव डिजेचा मालक यांची कसम चौकशी सध्या सुरू आहे. ताही घटनेमागे काय रहस्य आहे हे पोलिसांच्या चौकशीनंतर समोर येणार आहे.