Download App

डॉ. आंबेडकरांनी १०० वर्षांपूर्वी काळ्या पैशाविषयी लिहलं आहे की…” फडणवीसांनी कार्यक्रमात सांगितलं

  • Written By: Last Updated:

“काळ्या पैशांपासून आपल्याला कसं बाहेर पडता येईल, या प्रत्येक गोष्टीचं विवेचन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १०० वर्षांपूर्वी करून ठेवलं आहे.” असे उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी आज सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी बाबासाहेबांना चैत्यभूमीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस आणि राज्यपाल रमेश बैस यांनी अभिवादन केले. त्यावेळी कार्यक्रमात फडणसवीस बोलत होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर तत्ववेत्ते, समाजसुधारक, अर्थशास्त्री होते. त्यांनी १०० वर्षांपूर्वी ‘द प्रॉब्लेम ऑफ इंडियन रुपी’ हे पुस्तक लिहिलं. आज १०० वर्षांनी या पुस्तकात आपण डोकावून पाहतो, त्यावेळी लक्षात येतं की, ही व्यक्ती किती द्रष्टी होती.”

Prithviraj Chavan मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते?

काळ्या पैशाविषयी बाबासाहेब….

यावेळी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस म्हणाले की “आपल्या रुपयाची काय अडचण आहे, महागाई का होते, त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत, काळा पैसा कसा जमा होईल, त्या काळ्या पैशांपासून आपल्याला कसं बाहेर पडता येईल, या प्रत्येक गोष्टीचं विवेचन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १०० वर्षांपूर्वी करून ठेवलं आहे.”

जगाला हेवा वाटावा असे स्मारक

यावेळी फडणवीस यांनी डॉ. आंबेडकर यांच्या इंदू मिल मधील स्मारकावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, मागच्या काळात मुख्यमंत्री असताना इंदू मिलच्या जागेचा प्रश्न सोडविल्याचे आम्हाला समाधन आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला आहे. अडचणी दूर केल्यानंतर आता स्मारकाचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे.

विरोधकांच्या एकजुटीसाठी शरद पवार हे राहुल गांधी, खर्गेंच्या भेटीला

ते पुढे म्हणाले की, “पुतळ्याच्या परवानगीदेखील जवळपास झालेली आहे. म्हणून येत्या वर्षभरात ते स्मारक करता यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. दर 15 दिवसाला मुख्यमंत्री स्मारकाची परिस्थिती काय आहे याचा अहवाल घेत आहे. जगाच्या पाठीवर हेवा वाटावा, असे भव्य स्मारक मुंबईत तयार करणार आहोत.”

Tags

follow us