Download App

प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचे राज्यात पडसाद; मराठवाडा विद्यापीठात ‘एसएफआय’डून निदर्शने

प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटले. त्याचाच निषेध म्हणून मराठवाडा विद्यापीठात एसएफकडून निदर्शनं.

  • Written By: Last Updated:

SFI Protest on Praveen Gaikwad Attack : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी अक्कलकोट येथे एका टोळक्याने हल्ला केला. यावेळी प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर शाईफेक आणि वंगणाचे तेल ओतण्यात आले. यामध्ये प्रवीण गायकवाड यांच्या चेहऱ्याचा संपूर्ण भाग वंगण तेलाच्या काळ्या रंगाने माखून गेला होता. (SFI) प्रवीण गायकवाड यांच्यावरील या हल्ल्यानंतर राज्यभरात तीव्र सामाजिक आणि राजकीय पडसाद उमटले. त्याचाच निषेध म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एसएफआयकडून निदर्शनं करण्यात आले.

एसएफआयचे अरुण मते म्हणाले, महात्मा गांधी, नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश, गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांची विचारधारा हीच दीपक काटे व तत्सम गुडांची विचारधारा आहे. प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला शिव, फूले, शाहू आंबेडकर विचारधारेवर हल्ला आहे. तेव्हा या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो. दीपक काटे व तत्सम भाजपच्या गुंडावर कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गदारोळ, आंदोलकाने स्वतःवर पेट्रोल ओतून घेतले

एसएफआयचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. उमाकांत राठोड यांनी यावेळी निषेध नोंदवला. ते म्हणाले, भाजप व आरएसएसची विचारधारा याला जबाबदार आहे. भाजप आणि आरएसएस देशात राबवत असलेल्या चुकीच्या धोरणांवरही त्यांनी जोरदार टीका केली. याप्रसंगी डॉ. मारोती तेगमपुरे‌ यांनी आज महाराष्ट्रात सामान्य माणूस सुरक्षित नाही. दिपक काटे व तत्सम लोक हे फक्त चेहरे असून प्रविण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या मागे मोठं षडयंत्र असल्याचा थेट आरोप केला. त्याचबरोबर विद्यापिठातील एसएफआयचे नेते डॉ. लोकेश कांबळे यांनीही आपली भूमिका मांडली.

ते म्हणाले, देशात व विशेषत महाराष्ट्रात जे सामान्य लोकांवर हल्ले होत आहेत याचा निषेध केला व संविधानिक मार्गाने जस्यास तसं उत्तर दिलं गेलं पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली. त्यासोबतच पुरोगामी विचारांचे लोक, संस्था, संघटना यावर पुन्हा हल्ले होणार नाहीत यासाठीही काळजी घेतली पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले. एसएफआयच्या जिल्हाध्यक्ष मनिषा बल्लाळ यांनीही या हल्ल्याचा निषेध केला. त्या म्हणाल्या, प्रविणदादा गायकवाड यांच्यावर भाजपच्या गुडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध. त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. याप्रसंगी एसएफआय विद्यापीठ अध्यक्ष सुरज देवकर, शितल चोपडे, विजय उमाळे, संकेत चव्हाण, प्रदीप तेलंग, पवन जाधव, दिनेश सुर्यवंशी व शहरातील अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

follow us