Dr Pradnya Rajiv Satav : काँग्रेसच्या आमदारावर कळमनुरीत हल्ला!

हिंगोली : विधान परिषदेच्या (MLC) आमदार डॉ. प्रज्ञा सातव (Dr. Pradnya Satav) यांच्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कळमनुरीच्या (Kalamnuri) कसबे-धवांडा येथे हा प्रकार घडला. मी दौऱ्यावर होते, त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने माझ्यावर पाठीमागून हल्ला केला. अत्यंत निर्घृणपणे हा हल्ला बुधवारी (दि. ८) रोजी रात्री  साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती डॉ. प्रज्ञा सातव […]

Dr Pradnya Satav

Dr Pradnya Satav

हिंगोली : विधान परिषदेच्या (MLC) आमदार डॉ. प्रज्ञा सातव (Dr. Pradnya Satav) यांच्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कळमनुरीच्या (Kalamnuri) कसबे-धवांडा येथे हा प्रकार घडला. मी दौऱ्यावर होते, त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने माझ्यावर पाठीमागून हल्ला केला. अत्यंत निर्घृणपणे हा हल्ला बुधवारी (दि. ८) रोजी रात्री  साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती डॉ. प्रज्ञा सातव यांनी स्वत: ट्विट करुन दिली. डॉ. प्रज्ञा सातव या काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या पत्नी आहेत.

दरम्यान, या घटनेची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे. त्यांनी हिंगोली पोलीस अधीक्षक यांना तात्काळ दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

डॉ. प्रज्ञा सातव यांनी सांगितले की, मी कळमनुरी तालुक्यातील कसबे-धवांडा या गावाच्या दौऱ्यावर होते. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने माझ्यावर पाठीमागून हल्ला केला. माझे पती राजीव सातव हे हयात नाहीत. माझी मुले लहान आहेत. मी कोणाचेही वाईट केले नाही. माझ्या जीवाला धोका असला तरी मी माझ्या लोकांसाठी यापुढे काम करत राहणार आहे. महिला आमदारावरील हल्ला हा लोकशाहीवर हल्ला असल्याचे त्यांनी सांगितले.

हल्लेखोर हा अनोळखी व्यक्ती असून तो व्यक्ती माझ्याजवळ आला होता. कुणीतरी त्याला माझ्याबद्दल माहिती दिली आहे. बॉडीगार्ड माझ्यासोबत उभी होती. त्यावेळी हल्लेखोर मागील बाजूने आला आणि त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मला आज काही झालं असतं तर माझ्या कुटुंबासाठी अवघड झालं असतं. मी या घटनेची शांत न बसता पोलिसांकडे तक्रार केली असल्याचे डॉ. प्रज्ञा सातव यांनी म्हटले आहे.

Exit mobile version