Download App

2000 च्या नोटा चलनातून हद्दपार करण्याचे ‘हे’ परिणाम होणार; अर्थतज्ञांचा इशारा

Economist Ajit Abhyankar says ‘Stopping 2000 notes was a mistake, there will be huge consequences for the economy’: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) दोन हजार रुपयांच्या नोटा (two thousand rupee note) चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सूचनांनुसार, देशातील सर्वसामान्य लोकांना २३ मे ते २० सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या २,००० रुपयांच्या नोटा बँकेत जमा कराव्या लागतील किंवा बदलून घ्याव्या लागतील. अर्थात तोपर्यंत 2000 च्या नोटा चलनात राहतील आणि व्यवहारही करता येतील, असे आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आरबीआयच्या या निर्णयावर अर्थतज्ज्ञ अजित अभ्यंकर (Economist Ajit Abhyankar) यांनी केंद्र सरकारवर (central government) टीका केली आहे. या निर्णयाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असल्याचे अजित अभ्यंकर यांनी म्हटले आहे.

“मागील नोटाबंदीचा विचार करता, आजचा निर्णय हा अर्थव्यवस्थेला मोठा धक्का आहे. या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर येईल हा भ्रम आहे. पूर्वी लाखो कोटी रुपये बॅंकेत जमा झाले. पण, सरकारने त्यावर कारवाई केली नाही. पहिल्या नोटाबंदीचा फायदा काय झाला? मुळात 2000 च्या नोटा चलनात आणणे ही पहिली चूक होती आणि आता २ हजाराच्या नोटाबंदी ही दुसरी चूक ठरेल,” असा दावा अजित अभ्यंकर यांनी केला.

2000 Rupees Note: गुलाबी की जांभळा, दोन हजारच्या नोटेचा योग्य रंग कोणता माहित आहे का?

https://www.youtube.com/watch?v=WYyIDGgDii0

या निर्णयामुळे आता चलनात असलेल्या 13 टक्के चलन बंद होणार आहे. याला पर्याय काय हे अजून कळलेले नाही. केंद्र सरकारचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. याची उद्दिष्टे देशासाठी चांगली नाहीत. भविष्यात देशाच्या अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होणार आहे. या निर्णयाबाबत कोणतीही भीती नसून मोठा संशय आहे, बाजारात नोटांचा मोठा तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे बाजारपेठ आणि रोजगारावर परिणाम होईल. हा निर्णय सरकारने स्वतःच्या डोक्यावर लादला आहे. तो मान्य करायलाच हवा, असं अजित अभ्यंकर म्हणाले.

Tags

follow us