‘मंत्री दादा भुसेंची ईडी चौकशी करुन फौजदारी गुन्हे दाखल करा’

पुणे : महाविकास आघाडी सरकारमधील कृषिमंत्री दादा भुसे (Former Agriculture Minister Dada Bhuse) यांनी कृषिमंत्रिपदाच्या कार्यकाळात अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्यांसह पदोन्नती करून भ्रष्टाचार केला आहे. त्यांची चौकशी करून मालमत्ता जप्त करा. फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी सेलचे उपाध्यक्ष वसंत मुंडे (Maharashtra Pradesh Congress OBC Cell Vice President Vasant Munde) यांनी केली […]

Untitled Design (2)

Untitled Design (2)

पुणे : महाविकास आघाडी सरकारमधील कृषिमंत्री दादा भुसे (Former Agriculture Minister Dada Bhuse) यांनी कृषिमंत्रिपदाच्या कार्यकाळात अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्यांसह पदोन्नती करून भ्रष्टाचार केला आहे. त्यांची चौकशी करून मालमत्ता जप्त करा. फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी सेलचे उपाध्यक्ष वसंत मुंडे (Maharashtra Pradesh Congress OBC Cell Vice President Vasant Munde) यांनी केली आहे. मुंडे यांनी ईडीसह (ED) सीबीआय (CBI), लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं आणि लोकपालांकडं केली आहे.
YouTube video player
मुंडे यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीतून ही माहिती समोर आल्याचं सांगितलंय. नोव्हेंबर 2019 ते ऑगस्ट 2021 या काळात बदल्या करणं, पदोन्नती, निविष्ठा (खते, बियाणं, औषधे) परवानगी देणं, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील कामांना मंजुरी देणं, फार्मर्स प्रोडय़ुसर कंपन्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात लाच खाणं, कृषी विद्यापीठातील बांधकामांत टक्केवारी घेणं, कृषी विभागाच्या अन्य योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंडे यांनी केलाय.

मुंडे यांनी कृषी विभागाच्या प्रधान सचिव कार्यालयाकडून भुसे यांच्या काळात अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीबद्दलचा सर्व तपशील माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत मागवून घेतली होती. त्यानुसार ईडी, सीबीआय आणि लोकायुक्तांकडं चौकशी करण्याची, भुसेंची मालमत्ता जप्त करण्याची आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केलीय.

Exit mobile version