Download App

नाथाभाऊ, ‘हा’ देवेंद्र फडणवीसचा शब्द, राज्यपालपदावरून एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

Eknath Khadse On Devendra Fadnavis : भाजप (BJP) प्रवेशावरून सध्या राज्यातील राजकारणात चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे

  • Written By: Last Updated:

Eknath Khadse On Devendra Fadnavis : भाजप (BJP) प्रवेशावरून सध्या राज्यातील राजकारणात चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. मला फडणवीसांनी मुलीची शपथ घेऊन आश्वासन दिलं होतं असं देखील या कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसे म्हणाले.

या कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, मला एक दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी बोलावले होते. त्यावेळी आम्ही दोघेच होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, नाथाभाऊ तुमची मी राज्यपालपदासाठी शिफारस करत करतो, त्यावर मी त्यांना म्हणालो की, देवेंद्रजी खरं सांगा, यापूर्वी देखील तुम्ही मला अनेकदा सांगितलं की हे करणार, ते देणार ते काही झालं नाही त्यामुळे माझा विश्वास बसत नाही. तुम्ही मला राज्यपाल केले तर आनंदाची गोष्ट आहे, पण माझा विश्वास बसत नाही. त्यावर ते म्हणाले की, मी माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो हा देवेंद्र फडणवीसचा शब्द आहे. मात्र पुढे काय झालं मला माहिती नाही पण फडणवीसांनी मला आश्वासन दिले होते. असं एका कार्यक्रमा बोलताना एकनाथ खडसे म्हणाले.  तसेच ही गोष्ट साधारण 2019 सालातील आहे असेही ते यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमात बोलताना भाजप प्रवेशबद्दल देखील मोठा खुलासा केला आहे. यावेळी ते म्हणाले की, भाजपच्या एका जेष्ठ नेत्याचा फोनआल्याने मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीमध्ये जे.पी.नड्डा आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीत माझा भाजपमध्ये प्रवेश देखील झाला यावेळी रक्षा खडसेही उपस्थित होत्या. त्यांनी माझ्या गळ्यात भाजपचा मफलर घातला.

विधानसभेसाठी काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, राहुल गांधींसह ‘या’ नेत्यांचा समावेश

या घटनेला 5 ते 6  महिने होऊनही भाजपने माझा प्रवेश घोषित केला आणि अजून देखील मी वाट पाहत आहे मात्र अद्याप घोषणा झाली नाही त्यामुळे मी यापुढे भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर फुली मारलीय असेही यावेळी एकनाथ खडसे म्हणाले.

follow us