Download App

Maharashtra Politics : देशात मोदी तर महाराष्ट्रात शिंदे, जाहिरातबाजीतून शिंदेंनी फडणवीसांना डिवचलं…

शिवसेनेच्या एका सर्वेनूसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच महाराष्ट्रात अव्वलस्थान मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत.’देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली सर्वेक्षणाची जाहिरात प्रकाशित करण्यात आलीय. जाहिरातीमधून राज्यात देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांच्यात एकनाथ शिंदेंच अव्वल असल्याचं दर्शवण्यात आलं आहे. दरम्यान, शिवसेनेने प्रकाशित केलेल्या या जाहिरातीमुळे शिवसेनेने एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांना त्यांची जागा दाखवून डिवचण्यात आलं आहे. या जाहिरातीचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

पवार म्हणजे वैचारिक व्हायरस; सदावर्तेंनी ‘गुण’ उधळले

राज्यातल्या सर्वच वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेली ही जाहिरात सर्वांचच लक्ष वेधून आहे. जाहिरातीमध्ये एका सर्वेनूसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जोडीला पहिली पसंती दिल्याचं दर्शवण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणानूसार महाराष्ट्रातल्या जनेतेने एकनाथ शिंदे यांना 26.1 % टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना 23.2 % जनतेने कौल दिल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता 2014 च्या निवडणुकांनतर देशात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र असं सुत्र होतं. मात्र, अचानक शिवसेनेच्या या जाहिरातीमुळे देवेंद्र फडणवीसांना कमी लेखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं दिसून येत आहे.

IND vs AUS WTC Final: पराभवानंतर टीम इंडियाला मोठा झटका, ICC ने ठोठावला दंड

सर्वेक्षणात झालेल्या मतदानानूसार भाजपला राज्यात 30.2 % तर शिवसेनेला 16.2 % जनतेने कौल दिल्याचं दाखवण्यात आलं आहे. देशात मोदी राज्यात एकनाथ शिंदे यांच्या जोडीला महाराष्ट्राच्या जनतेकडून पसंती असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. सर्वेक्षणानूसार महाराष्ट्राची जनता एकनाथ शिंदे सरकारसोबत असल्याचं दर्शवण्यात आलं आहे.

अचानक देशात नरेंद्र, महाराष्ट्रात शिंदे असा दावा करण्यात शिवसेनेकडून करण्यात आला असून शिवसेनेकडून अधिकृत सर्वेचा हवाला न देता राज्यात देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे यांनाच जनतेचा कौल असल्याचं सांगण्यात येतंय. अर्थात तुम्ही कितीही दबावतंत्राचा वापर करा पण आमच्याशिवाय तुम्हाला पर्याय नसल्याचा मेसेज शिवसेनेकडून भाजपला देण्यात येत असल्याचं दिसतंय.

Tags

follow us