Download App

Eknath Shinde Group Visit Silver Oak : सामंत, गोगावले शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वर! कारण…

Eknath Shinde Group Visit Silver Oak : राज्यात गेल्या आठ-दहा महिन्यांपासून राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेटले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, भरत गोगावले आणि प्रा. डॉ. प्रदीप ढवळे यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन सदिच्छा भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे.

साईं दरबारीच भक्त आणि सुरक्षा रक्षक भिडले – Letsupp

मंत्री उदय सामंत यांनी सोशल मीडियावर भेटीचा फोटो ट्विट करत ही माहिती दिली आहे. ,मात्र, ही भेट नक्की कशासाठी घेतली, त्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

राजकीय वर्तुळात मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काही शिजतंय का, राज्यात पुन्हा नव्याने काही समीकरण बघायला मिळणार आहे का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

(248) Nitin Gadkari : गडकरींच्या डोक्यात ‘उजनी’साठी खास प्लॅन | LetsUpp Marathi – YouTube

Tags

follow us