Download App

दोन खासदार आणि दोन आमदारांच्या कामांसाठी एकनाथ शिंदेंनी घेतली खास बैठक

दोन खासदार आणि दोन आमदारांच्या कामांसाठी मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर खास बैठक घेतली. खासदार गजानन किर्तीकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अमीत साटम, आणि आमदार संजय गायकवाड यांच्या मतदारसंघांतीली विविध विकासकामे ‘मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सचिवांना दिले आहे.

बावनकुळेंकडे झेंडा अन् दुपट्टा तयार; राष्ट्रवादीच्या नेत्याची पाहतायत वाट

या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकप्रतिनिधींच्या विकासकामांचा आढावा घेतला आहे. आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विकासकामे कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी मिशन मोडवर काम करण्या्च्या सूचना दिल्या आहेत.

Gautami Patil ‘या’ चित्रपटात झळकणार, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

बैठकीत मुंबई महापालिका क्षेत्रातील खेळाची आणि मनोरंजनाची मैदाने देखभाल तत्वावर हस्तांतरीत करण्यास शासनाने दिलेली स्थगिती उठवावी, अशी मागणी खासदार किर्तीकरांनी केली. तसेच वर्सोवा अंधेरी येथील खाडीतील गाळ काढणे, त्याठिकाणी नविन मच्छीमार जेट्टी बांधणे याविषयी देखील बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

अंतिम निर्णय बाकी, पण माझ्याकडून… शरद पवारांच्या राजीनाम्यावर ठाकरे बोलले

त्याचप्रमाणे आमदार संजय गायकवाड यांच्या बुलढाणा मतदार संघातील बोदवड परिसर उपसासिंचन योजनेमुळे सुमारे ४३ हजार हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार असून त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार त्यामुळे या योजनेला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना दिले.

बुलढाणा शहरालगत कृषी महाविद्यालय स्थापन करणे, मोताळा तालुक्यात नवीन एमआयडीसी स्थापन करणे, बुलढाणा शहराला रिंग रोड मंजूर करून बुलढाणा-खामगाव रस्त्यावरील बोथा अभयारण्यात उड्डाणपुल बांधणे, राजूर घाटात एकेरी वाहतूक करणे आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली आहे.

Tags

follow us