Eknath Shinde meets Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात दुरावा निर्माण झाला होता मात्र आता दोघांची भेट झाल्याने आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीत नवीन राजकीय समीकरण दिसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधान आले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गट आणि मनसे दरम्यान युतीची चर्चा सुरु असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे दोघांची ही भेट महत्वाची मानली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्याचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) देखील असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मनसेचे काही प्रमुख पदाधिकारी बैठकीमध्ये सहभागी असल्याची माहिती देखील सध्या समोर येत आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवात 41 चित्रपटांची मेजवानी; आशिष शेलार यांची घोषणा
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपला बिनर्शत पाठिंबा दिला होता मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुती विरोधात उमेदवार दिल्याने एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात दुरावा निर्माण झाला असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने मनसे महायुतीसह मुंबई महानगरपालिका निवडणूक लढू शकते असा दावा देखील आता राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे.