Download App

Ahmedabad Plane Crash मध्ये सोलापुरातील वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू; मुलाचा व्यवसाय पाहण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं…

Ahmedabad Plane Crash मध्ये मृत पावलेल्यांपैकी दाम्पत्य सोलापुरातील होतं. त्यांचं मुलाचा व्यवसाय पाहण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं.

couple from Solapur dies in Ahmedabad Plane Crash; Dream of seeing son’s business remain a dream: गुजरातच्या अहमदाबाद (Ahmedabad Plane Crash) येथील मेघानी नगर परिसरात 12 जून गुरुवारी दुपारी 1.30 च्या सुमारास एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले (Ahmedabad Plane Crash) असून या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचा दावा असोसिएडेट प्रेस या संस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने केला आहे. या अपघातामध्ये मृत पावलेल्या प्रवाशांपैकी एक दाम्पत्य महाराष्ट्रातील सोलापुरातील होते. या अपघाताने त्यांचं मुलाचा व्यवसाय पाहण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं आहे.

मुलाचा व्यवसाय पाहण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं…

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील महादेव तुकाराम पवार, वय 68 वर्ष आणि आशा महादेव पवार वय 60 वर्ष हे दाम्पत्य जे सध्या गुजरात मधील नडियाद या ठिकाणी राहत होतं. मात्र ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील हातीद या गावचे राहीवासी होते. या दाम्पत्याचा अहमदाबाद ( Ahmedabad Plane Crash) विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे हातीद या गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान हे दाम्पत्य लंडनमध्ये आपल्या मुलाचा व्यवसाय पाहण्यासाठी चालले होते परंतु त्यांचं हे स्वप्न एक स्वप्नच बनून राहिलं आहे.

विमानात 1.25 लाख लिटर इंधन अन्… अहमदाबाद विमान अपघातावर गृहमंत्री अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया

महादेव पवार हे लहानपणापासूनच अहमदाबाद ( Ahmedabad Plane Crash) येथे स्थायिक झाले होते. तर त्यांचा एक मुलगा गुजरातमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो आणि दुसरा मुलगा लंडनमध्ये व्यवसाय करत असल्याने त्याच्याकडेच हे दाम्पत्य जायला निघालो होतो.दरम्यान गेल्या सहा महिन्यांपूर्वी देखील त्यांनी इंग्लंडला जाण्यासाठी तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी त्यांना ते तिकीट मिळाले नाही आणि त्यांचा दौरा रद्द झाला होता. असेच त्यांचे दोन प्रयत्न असफल राहिल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात ते इंग्लंडला जायला निघाले होते. मात्र त्यावेळी त्यांच्या विमान टेकऑफ करतानाच अपघातात मृत्यू झाला आहे.

follow us