Electric Vehicles Exempted From Toll : मंत्रिमंडळाच्या बैठकीत एका पाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेणाऱ्या फडणवीस सरकारने (Fadnavis Government) आता राज्यभरात EV वाहनांना टोलमाफी (Toll Tax) देण्यााचा निर्णय 29 एप्रिल 2025 रोजी पाड पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. त्यानंतर अखेर याबाबतचा शासन आदेश काल (दि.23) जारी करण्यात आला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी विद्युत वाहनांचे उत्पादन व वापराला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
आता टोल नाक्यावरील कर्मचारीही म्हणणार प्लीज, थँक यू; वाद टाळण्यासाठी NHAI चा खास निर्णय
मंत्रिमंडळातील निर्णय नेमका काय होता?
29 एप्रिल 2025 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वापूर्ण निर्णय घेण्यात आले होते. त्यात सर्व चारचाकी प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicles) व बसेसना पथकर पूर्ण माफ करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली होती. या निर्णयानुसार महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग यावर प्रवास करणाऱ्या सर्व चारचाकी प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना व बसेसना पथकर पूर्ण माफ केला जाणार आहे. राज्य सरकारने या निर्णयाला मान्यता दिली होती. पण त्याबाबतचे शासन आदेश काढले नव्हते. मात्र, अखेर शुक्रवारी (दि.23) याबाबतचा शासन आधेश जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग यावर प्रवास करणाऱ्या सर्व चारचाकी प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना व बसेसना पथकर पूर्ण माफ.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 29, 2025
राज्य महामार्गावरील EV वाहनांना टप्प्याटप्याने दिली जाणार सूट
राज्य सरकारच्या आधेशानुसार इलेक्ट्रिक वाहनांना दिली जाणारी सूट मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर आणि अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा सेतूवर प्रवासी विद्युत वाहनांना १०० टक्के पथकर माफी देण्यात आली आहे. तर, राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या उर्वरित राज्य मार्गावर विद्युत वाहनांना टप्याटप्याने पथकर माफी देण्याचा निर्णय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती घेणार आहे. माफ करण्यात येणाऱ्या पथकर माफीच्या रकमेची प्रतिपूर्ती अर्थसंकल्पीय तरतुदीद्वारे परिवहन विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागास करण्यात येईल.