Download App

सर्वधर्म समभाव हा नपुंसकपणा तर लाल किल्ल्यावर भगवा फडकवणार; संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्ये

Sambhaji Bhide यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. ते नाशिकमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही वक्तव्ये केली.

Equality among all religions is impotence, Bhagava will be hoisted on the Red Fort; Sambhaji Bhide’s controversial statements again : नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत येणारे शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. ते नाशिकमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही वक्तव्ये केली आहेत.

काय म्हणाले संभाजी भिडे?

यावेळी बोलताना भिडे म्हणाले की, सर्वधर्म समभाव हा नीचपणा, नपुंसकपणा आहे. तसेच सर्वधर्म समभाव म्हणजे ना धड स्त्री, ना धड पुरूष आहे. तसेच यावेळी त्यांनी पुर्वी केलेले आंब्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा पुनरूच्चार केला आहे. ते म्हणाले की, आंबे खावून मूलं होतं. मी आंब्याचं झाड लावलं आहे. तेथे जाऊन तुम्ही आंबे खाऊ शकता. त्याचबरोबर त्यांनी यावेळी म्हटलं की, खग्रास चंद्रग्रहण काळात मंत्राचा जप केल्यास मंत्राची शक्ती जन्मोजन्मी मिळते. 15 ऑगस्टला तिरंग्यासोबत लाल किल्ल्यावर भगवा फडकवणार आहोत.

मेष, मिथुन आणि तुळ राशिसाठी शुभ तर इतर राशींचं काय? जाणून घ्या आजचं राशीभविष्य

दरम्यान या अगोदर त्यांनी कोल्हापूर येथील आंदोलनावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास सांगत मराठ्यांनी दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला होता. त्यामुळे, हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवा आहे, असं वक्तव्य केलं आहे. या देशात जो महायज्ञ सुरू आहे, तो विझू देता कामा नये. या महायज्ञाची सांगता, या देशाच्या शीर्षस्थानी भगवा झेंडा आला पाहिजे अशी करायची आहे, असंही ते म्हणाले आहेत.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला पुन्हा हादरा; 25 टक्के टॅरिफ वाढवणार असल्याची केली घोषणा

पुढं बोलताना ते म्हणाले, शिवछत्रपती गेले प्रचंड नैराश्य आलं, आता पुढे काय? असा प्रश्न समोर आला. संभाजी महाराज छत्रपती झाले, केवळ पावणे 9 वर्षे छत्रपती म्हणून काम संभाजीराजेंनी केलं, आपल्या वडिलांना शोभेल असं काम त्यांनी केलं. वडिलांच्या तोडीस तोड कर्तृत्व गाजवलं, नंतर अतिक्रूर मरण त्यांच्या वाट्याला आलं. संभाजी महाराजांची जी हत्या झाली, त्या भडव्या औरंग्याने नीचपणा केला असंही ते म्हणाले.

follow us