Haribhau Bagade : सरकारी कामांमुळे सामान्य नागरिकांची होणार पायपीट आपण नेहमीच पाहतो. अनेकदा आपल्यालाही त्याचा अनुभव येत असतो. मात्र त्यासाठी लोकप्रतिनिधी सामान्या नांगरिकांच्या या अडचणी दूर करण्यासाठी पुढे आल्याच्या घटना अत्यंत कमी घडतात. मात्र अशी घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री मतदार संघामध्ये विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात… (Ex Legislative Assembly President Haribhau Bagade Aggressive on Officer )
ओंकार भागानगरे खून प्रकरणातील मुख्य दोन आरोपींना पुण्यातून अटक
फुलंब्री तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या कामांच्या फाईल्स सराकारी कार्यालयांमध्ये कित्येक दिवसांपासून पडून आहेत. त्यावरून काही शेतकऱ्यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी थेट पंचायत समितीमध्ये जाऊन या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. यावेळी त्यांनी अनेक दिवस होऊनही शेतकऱ्यांचे कामं होत नसल्याने या अधिकाऱ्यांना दम भरला.
Patna Opposition Parties Meeting : विरोधकांचे मिशन 2024! पण, राऊतांनी व्यक्त केली वेगळीच ‘भीती’
तसं पाहिलं तर विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना भाजपचे एक शांत आणि सयंमी नेते म्हणून पाहिलं जात. मात्र शेतकऱ्यांच्या या समस्या सोडवण्यासाठी या अधिकाऱ्यांवर बागडे आक्रमक झाले. त्यांच्या या संवादाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी यावर आमदार असावा तर असा अशा कमेंट करायला सुरूवात केली.