Tukaram Mundhe : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध विभागाकडून भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई सुरु असून संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचे काम करण्यात येत आहे. अन्न व औषध विभागाकडून सुरु असणाऱ्या कारवाईमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. वसई परिसरातील असणाऱ्या एका स्वीट्स दुकानाच्या (Sweet Shop) मालकाला तुकाराम मुंढेंच्या एफडीएचे अधिकारी असल्याची बतावणी करत तब्बल सहा लाख रुपयांना उकळल्याचा धक्कादायक प्रकरा समोर आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत विजय जाधव, स्वाती तुळसकर, तेजस राठोड आणि त्यांच्या एका साथीदाराविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात (Manikpur Police Station) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वत:ला अन्न व औषध प्रशासन अधिकारी असल्याचे भासवत आरोपींनी वसई परिसरातील स्वीट मार्ट आणि इतर दुकानांवर कारवाईची धमकी देत पैसे उकळले. या प्रकरणात आता पोलिसांनी फसवणूक, खंडणी आणि बनावट सरकारी अधिकारी बनून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी 25 वर्षांनी पुन्हा रंगमंचावर ; ‘नकाब’ साठी शिकागो गाठले-
या प्रकरणी तक्रारदार रोहित सुखडिया (Rohit Sukhadia) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जून रोजी आरोपी त्यांच्या दुकानात आले, आपण एफडीचे अधिकारी असल्याचे सांगत त्यांनी दुकानातील खाद्यपदार्थ व मुदतबाह्य वस्तूंचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर, दुकान सील करणे, गुन्हा दाखल आणि माध्यमांमध्ये बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी सुरुवातीला 12 लाखांची मागणी करण्यात आली होती मात्र वाटाघाटीनंतर सहा लाख रुपये घेण्यात आले असं तक्रारदार रोहित सुखडिया यांनी म्हटले आहे.
